Aadhaar bank link status : आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे? लाडकी बहीण, पीएम किसान चे पैसे या खात्यावर होत आहेत जमा | असे पहा आपले बँक खाते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.1/5 - (7 votes)

Aadhaar bank link status : राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तसेच राज्यातील शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजना चे अनुदान शासनाकडून त्यांच्या बँक खात्या मध्ये जमा केले जात आहे. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जाणार आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये पुढील काही दिवसांमध्ये जमा केले जाणार आहेत.

 

Aadhaar bank link status

 

 

परंतु, बर्‍याच शेतकरी बांधवांनी पीएम किसान साठी आणि महिलांनी त्यांचे नेहमी वापरत असलेले बँक खाते हे या योजना मध्ये अर्ज करताना सादर केले आहेत. परंतु, शासनाने आता कोणतेही अनुदान वितरण करत असताना त्यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये च वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करत असताना आपण जे खाते दिले आहे ते आधार शी संलग्न असणे गरजेचे आहे. (Aadhaar bank link status)

 

 

याठिकाणी तुम्ही तुमच्या आधार ला कोणते खाते लिंक आहे ते खालील पद्धतीने पाहू शकता. (Aadhaar bank link status)

 

 

स्टेप 1 : आपण आधार च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

 

UIDAI अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या

 

स्टेप 2 : लॉगिन या बटन वरती क्लिक करा

 

Aadhaar bank link status 1

 

 

स्टेप 3 : पुढे आपला आधार क्रमांक टाकून ओटीपी साठी क्लिक करा

 

Aadhaar bank link status 2

 

 

स्टेप 4 : त्यानंतर मोबाइल वर आलेला ओटीपी टाकून लॉगिन व्हा

 

स्टेप 5 : पुढे आपल्यासमोरील Bank Seeding Status या पर्याय वरती क्लिक करा

 

Aadhaar bank link status 3

 

 

स्टेप 6 : त्यानंतर आपल्याला आपले आधार शी लिंक बँकेचे नाव दाखविण्यात येईल

Aadhaar bank link status 4

 

 

तर, आपण अशा प्रकारे आपल्या आधार शी लिंक बँक खाते पाहू शकता. जर, आपले खाते आधार शी लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे किंवा पोस्ट बँकेचे नवीन खाते उघडावे.

 

ठरलं तर मग ! या तारखेला येणार 3000 रुपये बँक खात्यात

 

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!