Posted in

Kharip Paisewari : आणेवारी/पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? | कमी असेल तर काय फायदे होणार….

Kharip Paisewari Paisewari Anewari

Kharip Paisewari : राज्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीटीने शेत पिकांचे नुकसान किवा राज्यातील काही भागात दुष्काळ असला की आणेवारी/पैसेवारी असे शब्द आपण नेहमी एकत असतो. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल थांबवण्यासाठी, कमी किंवा तसेच रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते यालाच आणेवारी असा शब्द पुढे प्रचलित झाला.

 

Kharip Paisewari Paisewari Anewari

 

आणेवारी म्हणजे काय? (Kharip Paisewari)

 

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर एका पेक्षा अधिक मालक असतील तर त्या प्रत्येक भागधारकाच्या वाटची जमीन किती हे दर्शवण्याची पद्धत म्हणजे जमिनीची आणेवारी (Kharip Paisewari) काढणे असे होय. ब्रिटीश काळापासून सात बारा उतारा वरती आणेवारी दाखल केली जाऊ लागली. महसूलात एक आणा म्हणजे बारा पैसे आणि १९२ पैसे म्हणजे सोळा आणे तर सोळा आणे म्हणजे एक रुपया असे आहे.

 

 

तर, का काढतात आणेवारी?

 

एखाद्या जमीनीतून त्याठिकाणी किती उत्पन्न निघू शकते, त्यावरून महसूलाचा अंदाज बांधता यायचा. मग त्यात नजर आणेवारी, हंगामी आणेवारी (Kharip Paisewari) जाहीर केली जाऊ लागली. शासनाला शेतकर्‍यांच्या उत्पादनाचा अंदाज बांधता यावा तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात होणारि घट याचा अंदाज यावा व त्या अनुषंगाने मिळणाऱ्या महसूलाचा अंदाज बांधण्यासाठी ही आणेवारी काढली जायची.

 

 

दुष्काळाचा आणि आणेवारीचा काय संबंध?

 

आणेवारी काढताना त्याची सरासरी जर ५०% कमी असेल तर दुष्काळ व त्यापेक्षा अधिक असेल तर सुकाळ असे समजले जाते.

 

 

कमी आणेवारी असेल तर काय होते?

५०% पेक्षा कमी आणेवारी असेल तर त्या भागात दुष्काळ जाहीर केला जातो. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच कर्जमाफी, मुलांच्या शिक्षण शुल्कांमध्ये सवलती, पिण्याच्या व शेतीसाठी वापराच्या पाण्यामध्ये तसेच वीज बीला संदर्भातील सवलती दिल्या जातात.

 

 

खरीप हंगाम 2024 : आपल्या जिल्हयांची पैसेवारी येथे पहा

 

 

Tags: Kharip_Paisewari, anewari_paisewari, kharip_anewari, kharip_pasewari_anewari, drought_kharip, government_schemes_for_farmers_in_maharashtra,

 

हे पण पहा :

 

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी