Battery Spray Pump : बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
Battery Spray Pump : खरीप हंगाम मध्ये महाडीबीटी पोर्टल वर बॅटरी संचालित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. आणि त्या घटकाची सोडत काढून निवड झालेल्या शेतकर्यांना हे पंप 100% अनुदान वरती वितरण देखील करण्यात आले आहे. परंतु, आता सध्या सोशल मीडिया माध्यमा वरती परत बॅटरी पंप आणि सौर फवारणी पंप साठी 100% अनुदान वरती ऑनलाइन अर्ज सुरू झाले असल्याचे मेसेज फिरत आहेत. तर, यामागची काय सत्यता आहे हे आपण पाहू.
तर, मित्रांनो जिल्हा स्तरावरील कृषि कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या म्हणण्या नुसार अशा प्रकारची बॅटरी फवारणी पंप/सौर फवारणी पंप 100 % अनुदान योजना (Battery Spray Pump) ही नसून यासाठी शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या कोणत्याही सूचना ह्या आयुक्तालय स्तरावरून प्राप्त झालेल्या नाहीयेत. तर, महाडीबीटी पोर्टल वर बॅटरी पंप आणि सौर पंप हा घटक इतर घटका प्रमाणे पूर्वीपासून च आहे परंतु या घटका साठी योजने अंतर्गत निधि मंजूर झाल्यावर लक्षांक नुसार सोडत काढण्यात येते आणि हे घटक इतर घटका प्रमाणेच 40 ते 50% अनुदान वरती दिले जातात. परंतु, 100% अनुदान बाबत अशा कोणत्याही सूचना आयुक्तालय स्तरावरून प्राप्त झाल्या नाहीयेत.
तसेच, आपण खरीप हंगाम मध्ये 100% अनुदान वरती बॅटरी फवारणी पंप वितरण केले परंतु, ते सोयाबीन व कापूस मूल्यसाखळी योजना अंतर्गत विशेष बाब म्हणून हा घटक घेण्यात आला होता आणि यासाठी आयुक्तालय स्तरावरून सूचना होत्या की या घटकासाठी शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात यावेत त्यानुसार आपण त्याठिकाणी कार्यवाही केली होती. (Battery Spray Pump)
परंतु, सध्या अशा प्रकारची बॅटरी फवारणी पंप/सौर फवारणी पंप 100 % अनुदान योजना ही नसून यासाठी शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या कोणत्याही सूचना ह्या आयुक्तालय स्तरावरून प्राप्त झालेल्या नाहीयेत त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिक माहिती साठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क करावा. (Battery Spray Pump)
Tags : mahadbt battery operated spray pump, mahadbtfarmer schemes, mahadbt shetkari yojana, mahadbt yojana, mahadbt farmer yojana, solar operated spray pump,
* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू
* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत
* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती
* जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू…… असे चेक करा आपले पेमेंट स्टेटस
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर
* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी
* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार