Namo Drone Didi Yojana : राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता | मिळणार 8 लाख रुपये अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Namo Drone Didi Yojana : भारत सरकारने “नमो ड्रोन दीदी” ही योजना मंजूर केली आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतात १४५०० निवडक महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन पुरविण्यात येणार असून, या योजनेकरीता केंद्र शासनाकडून रु.१२६१.०० कोटी इतका निधि उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

Namo Drone Didi Yojana
Namo Drone Didi Yojana

 

सदर योजनेंतर्गत ड्रोनच्या खरेदीसाठी महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन व इतर साहित्य/अनुषंगिक खर्चाच्या ८०% दराने जास्तीत जास्त रु.८.०० लाख पर्यंतचे केंद्रीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

 

 

केंद्र शासनाच्या दिनांक ०९.०४.२०२४ च्या पत्रान्वये तसेच, दिनांक २८.१०.२०२४ च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. (Namo Drone Didi Yojana)

 

 

त्यानुसार राज्यात “नमो ड्रोन दीदी” या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबावणी व संनियंत्रणासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने “नमो ड्रोन दीदी” (Namo Drone Didi Yojana) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबावणी व संनियंत्रणासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यास दिनांक 23 जानेवारी 2025 च्या शासन निर्णया नुसार मान्यता देण्यात आली आहे.

 

 

कोण असेल पात्र? (Namo Drone Didi Yojana)

 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या योजनेमध्ये ज्या खत कंपन्या आहेत त्या महिला बचत गटांची निवड करतील. त्या गटातील सदस्यांना 15 दिवसांचे ड्रोन प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये 5 दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण अनिर्वाय आहे आणि तसेच 10 दिवस कीटक नाशक फवारणी प्रशिक्षण देण्यात येईल. 

 

 

अनुदान किती असेल?

 

तर, सध्या या ड्रोन ची किंमत ही 10 लाख रुपये आहे यामध्ये महिला बचत गटांना या योजनेद्वारे जास्तीत जास्त 80% किंवा 8 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

 

 

ड्रोन द्वारे फवारणी साठी एकरी दर किती आहे?

 

तर, सध्या उत्तर भारतामध्ये ड्रोन द्वारे एका फवारणी साठी एकरी 300 ते 600 रुपये भाडे आकारले जाते.

 

 

अर्ज कोठे आणि कसा करावा?

 

अनुदान साठी पात्र करण्यासाठी खत कंपनी ही महिला बचत गटांची निवड करनार आहेत तर अद्याप या योजना विषयी सविस्तर मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीयेत. सविस्तर मार्गदर्शक सूचना आल्यानंतर आपल्याला या संकेतस्थळा वरती उपलब्ध करून दिल्या जातील.

 

 

राज्यात अमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय 

Namo Drone Didi Yojana 2

 

 

येथे पहा 

 

 

अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

Tags: namo drone didi yojana, namo drone didi scheme, namo drone yojana, namo drone application,

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!