Posted in

MahaDBT Pre-sanctions : पूर्वसंमती ची वाट पाहत आर्थिक वर्ष संपले | कृषि यंत्र, तुषार, ठिबक संमती कधी मिळणार?

Mahadbt pre sanctions
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

MahaDBT Pre-sanctions : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टल वर अपलोड केल्यानंतर त्याची छाननी करून त्यांना घटक खरेदी करण्यासाठी संमती (पूर्वसंमती) देण्यात येते आणि त्यानंतर खरेदी झाल्यावर तपासणी करून अनुदान वितरण केले जाते.

 

परंतु, महाडीबीटी वरील जवळपास 2,91,973 शेतकरी हे ऑक्टोबर 2025 या महिन्यापासून पूर्वसंमती ची वाट पाहत आहेत. यामध्ये कृषि यंत्र, तुषार, ठिबक साठी कागदपत्रे अपलोड केलेले शेतकरी असून हे मागील सहा महिन्यांपासून पूर्व संमती कधी मिळेल या कडे लक्ष लाऊन बसले आहेत. परंतु, आज मार्च अखेर आला असून देखील अद्याप या शेतकर्‍यांना पूर्व संमती मिळालेली नाही. MahaDBT Pre-sanctions

 

याविषयी तालुका कृषि कार्यालयांमध्ये विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात येते की, महाडीबीटी पोर्टल वर पूर्वसंमती चा टॅब हा लॉक केलेला असून तालुका स्तरावरून अर्जाला पूर्व संमती प्रदान करता येत नाही. हा विषय कृषि आयुक्तालय स्तरावरील असून या समस्या विषयी आम्ही सर्व तालुका कृषि अधिकारी वरिष्ठ यांच्या बैठकीत वारंवार विचारणा करीत आहोत परंतु अद्याप यावरती कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.  MahaDBT Pre-sanctions

 

सद्यस्थिती मध्ये महाडीबीटी पोर्टल वर पूर्व संमती साठी खालील प्रमाणे योजना निहाय शेतकरी प्रतीक्षेत आहेत :

 

राज्य कृषि यांत्रिकीकरण योजना : 1,75,410

कृषि यांत्रिकीकरण उप-अभियान : 20,809

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना : 95,754

एकूण : 2,91,973

 

 

हे पण पहा :

 

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती पहा

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

error: Content is protected !!