Posted in

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार | “हे” आहेत अहवालातील महत्वाचे मुद्दे?

Shetkari karjmafi ahval
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4/5 - (2 votes)

Shetkari Karjmafi : राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (Shetkari Karjmafi)

 

राज्यात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे थकीत असलेले 2 लाखांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि सहकार विभागाशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालातील शिफारशींवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. (Shetkari Karjmafi)

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानही देण्याची घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ही योजना राबविण्यात येणार असून यासाठी ३५ हजार कोटी रुपयांपर्यंत भार राज्याच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यापूर्वीच ही कर्जमाफी देण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्य उच्च अधिकार समिती नेमण्यात आली आहे. (Shetkari Karjmafi)

 

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे (Shetkari Karjmafi)

 

ही कर्जमाफी देताना सहकार विभागातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, त्या जमिनीचा पिकांसाठीचा वापर, केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी, अतिवृष्टीत मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या तसेच साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित एफआरपी मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या गोळा करण्यात येत आहे. (Shetkari Karjmafi)

 

या सर्व माहितीची जुळवणी करून किती शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, कोणते शेतकरी पात्र ठरू शकतात त्यासाठी किती निधी लागू शकतो, याचा अभ्यास येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर हा अहवाल राज्य सरकारला सुपूर्द करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायची हा सर्वस्वी सरकारचा निर्णय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (Shetkari Karjmafi)

 

 

हे पण पहा :

* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी

* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार

* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता 

* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

 

error: Content is protected !!