Agri Mechanization : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते.
सन २०२५-२६ मधील कृषी यांत्रिकीकरण योजनां मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना वितरण साठी 1,121 कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. गेल्या वर्षी मिळालेल्या अनुदानाच्या तुलनेत हा निधी 860 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा एक लाख ६० हजार सुधारित कृषी अवजारे घेता आली. यामुळे शेतीमाल उत्पादन वाढीबरोबरच कृषियंत्रे व अवजारे उत्पादन क्षेत्राच्या व्यवसाय वृद्धीला चालना मिळाली आहे, असे बाजारपेठेतील तज्ज्ञांचे मत आहे. Agri Mechanization
चालू आर्थिक वर्ष संपण्याच्या दिवशी सुधारित मान्यता तसेच, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेकरिता आर्थिक वर्ष संपण्याच्या दिवशी ७०० कोटी रुपयांच्या कार्यक्रमास कृषी विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. या योजनेसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासही हिरवा कंदील दाखवला. Agri Mechanization
कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. हा निधी खर्च झाल्यानंतर दायित्व कमी करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज कृषी विभागाला होती. निधीची चणचण असल्यामुळे राज्य सरकारवर दायित्व वाढले होते.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी ७०० कोटी रुपयांची मान्यता मिळावी, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने विभागाकडे पाठविला होता. त्यानुसार ७०० कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ३०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. ‘डीबीटी’ अंतर्गत (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर थेट लाभ हस्तांतर) राज्यातील ३२ लाख अर्जाना पूर्वसंमती देण्यात आली होती. राज्य सरकारने लॉटरी पद्धत बंद करून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या नियोजनाप्रमाणे डीबीटीअंतर्गत प्रलंबित असलेले सर्व अर्ज निकाली काढले. त्यामुळे आता यापुढे गरजू शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अवजारे आणि यंत्रे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Agri Mechanization
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

