MahaDBT Seed Subsidy : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे खरीप हंगाम 2026-27 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर खाईर्प पिकांचे अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे इच्छुक शेतकरी व शेतकरी गट जे आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता. (MahaDBT Seed Subsidy)
वैयक्तिक शेतकरी हे प्रमाणित बियाणे घटका म्हणजेच 40-50% अनुदान वरील बियाणे करिता अर्ज करू शकतील तर शेतकरी गट हे पीक प्रात्यक्षिक बियाणे म्हणजेच 100% अनुदान वरील बियाणे करिता अर्ज सादर करू शकतील.
या शेतकर्यांना लाभ मिळणार नाही?
महाडीबीटी पोर्टल वर गतवर्षी म्हणजे खरीप/रब्बी 2025-26 मध्ये ज्या शेतकर्यांनी किंवा शेतकरी गटांनी बियाणे घटकाचा लाभ घेतला आहे असे शेतकरी व शेतकरी गट हे मार्गदर्शक सुचणे नुसार या वर्षी परत लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत त्यामुळे अशा शेतकर्यांना या वर्षी बियाणे घटकासाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार नाही.
खरीप हंगाम बियाणे साठी महाडीबीटी च्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या घटका अंतर्गत बियाणे घटकामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर इ., पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करू शकता. MahaDBT Seed Subsidy
इच्छुक शेतकऱ्यांना दि. 15 एप्रिल 2026 पासून दि. 15 मे 2026 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. तरी, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. MahaDBT Seed Subsidy
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
