Agri Mechanization : आता अनुदानित कृषि यंत्रांवर विशिष्ट क्रमांक सक्तीचा | योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नवीन पद्धती
Agri Mechanization : कृषि विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे शासनाच्या योजनमधून अनुदानित यंत्रे दिली जातात. परंतु, या अनुदानातून विकल्या जाणाऱ्या कृषी यंत्रांमध्ये गैरप्रकार होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अनुदानित कृषि यंत्रांवर विशिष्ट क्रमांक नमूद करण्याची पध्दत देशभर लागू करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानातून कृषी यंत्रे Agri Mechanization व अवजारे अनुदानावर विकली जातात. परंतु, या यंत्रावरती कोणताही असा विशिष्ट क्रमांक सध्या टाकण्यात येत नाही त्यामुळे या बाबतीत हेराफेरी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आता नवीन पद्धती लागू केली जात आहे. यामध्ये यंत्रांवरील क्रमांक नमूद करण्याची पद्धत या नियमावलीद्वारे निश्चित करण्यात आली आहे.
तर, आता नेमके काय करावे लागेल? Agri Mechanization
- प्रत्येक उत्पादकाला एक लाखाहून अधिक किंमत असलेल्या यंत्रे व औजारे यांच्या दर्शनी भागात विशिष्ट क्रमांक टाकावा लागेल
- हा क्रमांक किंवा अक्षरांचा आकार २५ mm पेक्षा लहान नसेल
- या क्रमांकाची चौकट संबंधित यंत्राच्या मुख्य सांगाड्याला वेल्डिंगने जोडावी लागणार आहे.
- उत्पादकाला www.agrimachinery.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल
- अनुदानित यंत्राची माहिती ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे सादर करावी लागणार
- या नियमांमुळे केंद्र किंवा राज्य शासनाला अनुदानित यंत्राबाबत मागोवा प्रणाली (ट्रेसिबिलिटी सिस्टिम) उपलब्ध होणार आहे
तर, या नवीन पद्धतीमुळे कृषि यांत्रिकीकरण योजनेतील गैरप्रकार बंद होतील अशी अपेक्षा आहे.
अधिक वाचा :
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात