Helpline Number : कृषि तक्रार व्हॉटसअॅप हेल्पलाइन नंबर | आता बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार
Agriculture Helpline Number: कृषि मंत्री यांनी कृषि विभागाचे सचिव, कृषि आयुक्त, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक, सहसचिव आणि इतर अधिकारी यांची मंत्रालयामध्ये दिनांक 18 जुलै रोजी राज्याचे बैठक घेतली.
या बैठकी दरम्यान राज्यामध्ये बोगस बियाणे विक्री बाबत चा प्रश्न उपस्थित करून असे बियाणे विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात येऊन शेतकर्यांना त्वरीत न्याय मिळवून देण्याची गरज आहे असे संगितले आहे. (Helpline Number)
तसेच, शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकां संबंधी तक्रार करण्यासाठी एक व्हॉटसअॅप क्रमांक सुरु करून तो राज्यातील सर्व शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात यावा. शेतकऱ्यांनी या व्हॉटसअॅप क्रमांकावर (Helpline Number) तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात यावी. तसेच संबंधित जिल्ह्यातील जे भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना कृषि मंत्री यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या होत्या.
तर, त्यानुसार आता कृषि विभाग शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकां संबंधी तक्रार करण्यासाठी एक व्हॉटसअॅप क्रमांक सुरू केला असून शेतकरी हे खालील दिलेल्या क्रमांक वरती तक्रार करू शकतात. (Helpline Number)
कृषि तक्रार व्हॉटसअॅप हेल्पलाइन नंबर : +91 9822446655
अधिक वाचा :
* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार
* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना
* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत
* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा