Battery Spray Pump : बॅटरी फवारणी पंप निवड झाली …. मग आता पुढची प्रोसेस काय? | कधी मिळणार पंप?
Battery Spray Pump : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्याची सोडत ही दिनांक 09 सप्टेंबर रोजी काढण्यात आली आहे. परंतु हे निवड झालेले शेतकरी यांना अद्याप पंप मिळाले नाहीत आणि निवड झालेल्या शेतकर्यांना हे पंप कधी मिळणार आणि पुढील प्रोसेस काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये बॅटरी पंप ह्या निविष्ठा १०० % अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 1 महिन्या पासुन ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू होती आणि दिनांक 09 सप्टेंबर रोजी या अर्जंचि सोडत काढण्यात आली आहे. (Battery Spray Pump)
कधी मिळणार पंप? (Battery Spray Pump)
जवळपास सर्व जिल्ह्यातील तालुक्यांच्या तालुका कृषि कार्यालयांमध्ये हे फवारणी पंप पुरवठा करण्यात आले आहेत फक्त काही तालुक्यांमध्ये लक्षांक च्या 50% फवारणी पंप हे पुरवठा झाले आहेत उर्वरित पंप हे 17 सप्टेंबर पर्यन्त सर्व तालुक्यांच्या कृषि कार्यालयामध्ये पुरवठा होण्याची शक्यता आहे. तालुका कृषि कार्यालयात पंप पुरवठा झाला की हे पंप निवड झालेल्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. म्हजेच हे पंप 18 सप्टेंबर पासून सर्व तालुक्यांमध्ये वितरण सुरू होईल अशी शक्यता आहे. (Battery Spray Pump)
निवड झाली आहे … कागदपत्रे काय द्यायची?
निवड झालेल्या शेतकर्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालया खालील कागदपत्रे सादर करावीत :
1. आधार
2. सात बारा (ज्या योजनेत निवड झाली त्या पिकाची सात बारा वरती नोंद असणे आवश्यक)
3. पंप सुव्यवस्थित मिळाल्याचे प्रमाणपत्र ( पंप मिळाल्या नंतर द्यावे) येथे डाऊनलोड करा
पंप हस्तगत केल्यानंतर तो व्यवस्थित असल्याची खात्री करावी आणि त्यानंतर पंप सुव्यवस्थित मिळाल्याचे प्रमाणपत्र हे तालुका कृषि कार्यालयामध्ये सादर करावे.
तर, निवड झालेल्या शेतकरी बांधवांना हे पंप 100% अनुदान वरती मिळणार आहेत. पंप साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क हे आकारले जाणार नाही त्यामुळे निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी पंप हस्तगत करण्यासाठी आपल्या तालुका कृषि कार्यालयात संपर्क करावा.
बॅटरी संचलित फवारणी पंप सुस्थितीत प्राप्त असले बाबत चे प्रमाणपत्र : डाऊनलोड करा
फवारणी पंप सोडत यादी : येथे पहा
Tags: mahadbt-farmer-battery-spray-pump-lottery-list, mahadbtfarmer, mahadbtlotterylist,