Crop Insurance : पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळणार का? Pik vima
Crop Insurance : या वर्षी खरीप हंगामात (pik vima kharip 2024) पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै 2024 होती. परंतु राज्यातील अद्याप बरेच शेतकरी बांधव हे पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
कारण, राज्यामध्ये यावर्षी जून-जुलै मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे सर्व शेतकरी बांधव हे शेती कामात असल्यामुळे व तसेच राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे महा इ सेवा केंद्र चालक हे या योजनेसोबत पीक विमा अर्ज भरण्या च्या कामांमध्ये व्यस्त आहेत. परंतु, या गोंधळा मध्ये बरेच शेतकरी हे पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने आता कृषि विभागाकडून केंद्राचे कृषि मंत्रालयाचे सचिव यांना पीक विमा भरण्यासाठी राज्यामध्ये 31 जुलै पर्यन्त मुदत वाढ देण्या साठी पत्रव्यवहार केला आहे.
तर, आता राज्यातील शेतकर्यांना पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळेल अशी अपेक्षा आहे.