E-KYC : सर्वर डाउन ?? केवायसी अभावी अनुदान रखडले | Drought Relief Fund

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

e-kyc : महाराष्ट्र शासनाकडून गारपीट, अतिवृष्टी तसेच दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंक खात्याची ‘केवायसी’ करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आणि ही ‘केवायसी’ (e-kyc)केल्याशिवाय शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यामध्ये अनुदान रक्कम जमा होत नाही. ही पद्धत गेल्यावर्षी पासून राज्यात राबविली जात आहे. 

E Kyc

E-KYC : सर्वर डाउन ??

 

शासनाने दुष्काळी, अतिवृष्टी अनुदान जमा करण्यास सुरुवात केली आहे परंतु मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे केवायसी e-kyc लिंक प्रणाली ही बंद आहे. परिणामी शेतकरी हे बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने त्रस्त झाले आहेत.

 

 

माहे नोव्हेंबर डिसेंबर 2023 मधील अतिवृष्टी तसेच दुष्काळी अनुदान देण्यासाठी शासनाकडून याद्या ह्या आपत्ति व्यवस्थापन विभागाच्या डीबीटी पोर्टल वर अपलोड करण्यात आल्या असून ऑनलाइन पोर्टलला विशिष्ट क्रमांक (VK ID) टाकून केवायसी करण्याचे काम सुरू झाले होते. परंतु रोजच सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकर्‍यांची ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाहीये.

 

 

शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी बांधव हे पदरचे पैसे खर्च करून महा ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी जात आहेत आणि त्याठिकाणी सर्वर डाउन असल्याने केवायसी e-kyc न करताच त्यांना परत जावे लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांना ई-केवायसी साठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तर, शासनाने केवायसी लिंक सुरू करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे, अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

 

अधिक वाचा :

* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता

* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!