Crop Insurance : पीक विमा योजनेत नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना आदेश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance : राज्यामध्ये सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि पीक विमा योजनेत आता पिकांच्या कोणत्याही अवस्थेमध्ये नुकसान झाल्यास 100% नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा हे कंपन्यांना दिले आहेत

 

Crop Insurance पीक विमा योजना

 

१०० टक्के नुकसानभरपाई Crop Insurance

 

केंद्र सरकारने खरीप हंगाम पीक विमा योजनेचे (Crop Insurance) निकष बदलून आता कोणत्याही टप्प्यावर म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास 100 टक्के नुकसानभरपाई देण्याचे आदेश हे विमा कंपन्यांना दिले आहेत. परंतु, या निर्णयाला राज्यातील विमा कंपन्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे कंपन्यांनी केली आहे.

 

 

सध्या खरीप 2023-24 हंगामासाठी पीक विमा कंपन्यांकडून पीक वाढीची अवस्था व उत्पादन खर्चानुसार नुकसान भरपाई दिली जात होती. म्हणजे, लागवडीनंतर एक महिन्या आत नैसर्गिक आपत्ती मुळे जर पिकाचे नुकसान झाल्यास 45 टक्के उत्पादन खर्च गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात येत होती. (Crop Insurance)

 

 

परंतु, आता केंद्राने निकष बदलून लागवडीनंतर/पेरणीनंतर कोणत्याही स्थितीत व कालावधीत नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना संपूर्ण 100 टक्के भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत आणि या निर्णयाची अंमलबजावणी ही खरीप 2023-24 हंगामापासून केली आहे. (Crop Insurance)

 

 

त्यामुळे आता विमा कंपन्यांना खरीप 2023-24 मध्ये दिलेल्या नुकसानभरपाईची अतिरिक्त रक्कमही द्यावी लागणार आहे. मात्र, कंपन्यांनी या निर्णयाला तीव्र असा विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

तर, पीक विमा योजनेच्या या बादलविषयी शासन पुढील काय निर्णय घेणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.  

 

 

अधिक वाचा :

* सर्वर डाउन ?? केवायसी अभावी अनुदान रखडले

* अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो?

* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता

* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

error: Content is protected !!