सात बारा वरती कांदा पिकाची नोंद नाही, अनुदान मिळणार का? महसूल मंत्री काय म्हटले … | Onion Subsidy Maharashtra farmers

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post
onion subsidy maharashtra farmers
Onion Subsidy Maharashtra farmers

 

महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षातील फेब्रुवारी मध्ये कांदा बाजारभाव हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते त्यानंतर सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून Onion Subsidy Maharashtra farmers  याबाबत शासनाने अनुदान देणे करिता मागणी केली होती त्यानुसार आज दिनांक 27 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकरी यांना अनुदान देणे करिता आज शासन निर्णय जाहीर केला आहे.

 

नक्की वाचा : कांदा अनुदान योजना शासन निर्णय 27 मार्च 2023 आला

 

तर शासन निर्णयानुसार राज्यातील कृपी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेड कडे दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधी मध्ये लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना रु ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त प्रति शेतकरी २०० क्‍विंटल याप्रमाणे Onion Subsidy Maharashtra farmers  अनुदान मंजूर करण्याचा हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

 

 

परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडे कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करायवाचा आहे. Onion Subsidy Maharashtra farmers

 

 

पण, बहुतांश शेतकर्‍यांकडे कांदा विक्री पट्टी आहे पण 7/12 उतार्‍यावर कांदा पिकाची नोंद केलेली नाहीये यामुळे अनेक शेतकरी हे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याबाबत सोलापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी अनुदानासाठी सात बारा उताऱ्यावर कांद्याची नोंद आवश्यक असल्याचे स्पष्ट केले असून अशी कांदा पिकाची नोंद असल्याशिवाय अनुदान मिळणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

नक्की वाचा : कांदा अनुदान योजना अर्ज pdf डाऊनलोड करा

 

तसेच , कांदा विक्रीच्या अनुदान वाटपामध्ये बोगसगिरी होण्याची भीती आहे आणि याविषयीच्या नियम व अटी रद्द केल्यास शेतकऱ्यां ऐवजी कांदा व्यापारी व दलालच या अनुदानाचा गैरफायदा घेतील. यासाठी सात बारा उताऱ्यावरील नोंदीची अट बंधनकारक आहे. यामुळे सात बारा उतारा वरील नोंदीची आवश्यकता आहे’ असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

अधिक वाचा :

* कृषि विभाग भरती जाहिरात पहा

* कांदा अनुदान योजना अर्ज pdf डाऊनलोड करा

* पॅन आधार लिंक केले का? केले नसेल तर मग येथे पहा

* नवीन कृषि यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान योजना शासन निर्णय पहा

 

error: Content is protected !!