Ginger Market Price: आल्याच्या दरात तेजी | मागील तीन वर्षापासून उचांकी दर, आले उत्पादक शेतकर्यांना दिलासा
नमस्कार शेतकरी बांधवानो, सध्या आले बाजारभावात तेजी आलेली आहे. सध्या आल्याचे दर हे तेजीत असून आले उत्पादक शेतकर्यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. मागील 3 वर्षापासून आले दर हे यावर्षी उचांकी आहेत.
आले दरात तेजी
कोविड नंतर 3 वर्ष आले पिकाचे दर कमी Ginger Market Price असल्यामुळे शेतकर्यांना हवा तसा नफा मिळाला नाही. तर, यावर्षी मात्र आले उत्पादक शेतकर्यांना उचांकी दर मिळत आहे.
आले पिकासाठी उत्पादन खर्च हा जास्त लागतो परंतु बाजारात आले पिकास हवा तसा दर मिळत नसल्यामुळे बरेच शेतकरी हे आले पिकाकडून इतर पीक पद्धतीकडे वाळलेले दिसत आहेत परंतु यावर्षी लागवडीखालील क्षेत्रातील घट, सततचा पाऊस आणि कीड रोग यामुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे त्यामुळे बाजारातील आवक देखील कमी झाली आणि परिणामी मागणी जास्त असल्यामुळे आल्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. Ginger Market Price
नक्की वाचा : पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा
शेतकर्यांना सध्या बाजारात आल्याचे दर हे चांगले मिळत असून सध्या सरासरी 8000 ते 14000 रुपये प्रती क्विंटल असा दर Ginger Market Price मिळत आहे. आणि आल्याची निर्यात आणि सुंठ निर्मिती साठी सध्या मागणी असल्यामुळे ही आल्याची तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज तज्ञ अभ्यासकांनी दिला आहे.
आजचे आले बाजारभाव Ginger Marekt Price Today
आज महाराष्ट्रातील इतर बाजारसमिति मधील आले आवक आणि दर रुपये प्रती क्विंटल खालील प्रमाणे आहेत.
आले/अद्रक बाजार भाव | ||||
बाजार समिती | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
पुणे | 184 | 4000 | 14000 | 9000 |
मुंबई | 1055 | 10000 | 14000 | 12000 |
कराड | 9 | 11000 | 13000 | 13000 |
जुन्नर – नारायणगाव | 5 | 5000 | 12500 | 8000 |
जळगाव | 30 | 7000 | 11000 | 9000 |
छत्रपती संभाजीनगर | 25 | 8000 | 11000 | 9500 |
सातारा | 1 | 5000 | 11000 | 8000 |
कामठी | 1 | 9000 | 11000 | 10000 |
चंद्रपूर – गंजवड | 63 | 8300 | 10000 | 8500 |
वडगाव पेठ | 50 | 5000 | 6000 | 5500 |
पुणे-मोशी | 10 | 5000 | 6000 | 5500 |
पाटन | 3 | 3500 | 4500 | 4000 |
श्रीरामपूर | 29 | 2500 | 3500 | 3000 |
नक्की वाचा : ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….
अधिक वाचा :
* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे
* आता शेतकर्यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत
* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती
* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा