Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील “या” महसूल मंडळामध्ये खरीप 2022 सोयाबीन पीक विमा मंजूर | लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात होणार जमा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम – 2022 (Crop Insurance) राबविण्यासाठी शासनाने शासन निर्णय 1 जुलै 2022 अन्वये परभणी जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी ICICI Lombard General Insurance Company Limited या पीक विमा कंपनीकडून योजना राबविण्यास मान्यता दिलेली होती. त्यानुसार राज्य शासनाने कप अ‍ॅन्ड कॅप मॉडेलनुसार (80-110) बीड पॅटर्ननुसार राबविण्यास मान्यता दिली होती.

 

crop insurance PMFBY
Crop Insurance

तर, परभणी जिल्ह्यातील माहे ऑगस्ट सेप्टेंबर मधील सततच्या पाऊसामुळे शेतपिकांचे नुकसान Crop Insurance झाले होते त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट आढळून आली होती. त्यात, सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान होऊन सोयाबीन च्या उत्पादनात घट झाली होती.

 

 

खरीप हंगाम 2022 मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळ मध्ये सोयाबीन पिकाचे पीक कापणी प्रयोग Crop Insurance करण्यात आले होते. त्यामध्ये, जिल्ह्यातील पालम, गंगाखेड, सेलू, पाथरि, परभणी, पूर्णा, मानवत, सोनपेठ, जिंतुर या सर्व तालुक्यांमध्ये उत्पादनाची आकडेवारी काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग करण्यात आले होते.

 

 

तर, पीक कापणी प्रयोग नुसार गंगाखेड, आणि पालम तालुक्यातील मंडळ मध्ये सोयाबीन पिकाचे उत्पादन हे उंबरठा उत्पन्न पेक्षा कमी आले त्यामुळे या तालुक्यातील काही मंडळामध्ये सोयाबीन पिकाचा पीक विमा Crop Insurance हा लागू करण्यात आला आहे.

 

 

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील महातपुरी आणि पिंपळदरी हे दोन महसूल मंडळ हे सोयाबीन पीक विमा Crop Insurance साठी मंजूर झाले असून पालम तालुक्यातील बनवस हे महसूल मंडळ पीक विम्या साठी पात्र आहे. तर, वरील मंडळातील सर्व पीक विमा भरलेल्या शेतकर्‍यांना लवकरच पीक विमा हा त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.

 

 

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी मंडळातील शेतकर्‍यांना एकूण 23 कोटी 44 लाख रुपये हे पीक विम्या साठी वितरित करण्यात येणार आहेत आणि पिंपळदरी मंडळातील शेतकर्‍यांना एकूण 4 कोटी 77 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

 

 

पालम तालुक्यातील बनवस मंडळातील शेतकर्‍यांना एकून 12 कोटी रुपये हे पीक विम्या साठी वितरित करण्यात येणार आहेत.

 

 

तर, परभणी जिल्ह्यातील वरील मंडळातील शेतकर्‍यांना लवकरच त्यांचा खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा करण्यात येणार आहे.

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती

error: Content is protected !!