Krushi Sevak Mandhan: राज्यातील कृषि सेवकांचे लवकरच मानधन वाढ होणार | लवकरच येणार शासन निर्णय | अखेर मार्ग मोकळा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Mandhan: कृषी विभागाच्या (KrishiVibhag) विविध प्रकारच्या योजना जसे की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt) या अंतर्गत कृषी यांत्रिकरण उपाभियान, राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत विविध घटकांची अंमलबजावणी ही कृषी विभागातील महत्त्वाचा घटक असलेले कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक हे शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतात. कृषि सेवक/कृषि सहाय्यक (Krushi Sevak Mandhan) हे गाव पातळीवरील कृषि विभागाचे नेतृत्व करत असतात तसेच कृषि विभागाच्या विविध योजना ह्या शेतकर्‍यांना बांधावर पोहचविण्याचे कार्य हे कृषि सेवक करत असतात.

Krushi Sevak Mandhan

महाराष्ट्र राज्य मध्ये 2000 पेक्षा अधिक कृषी सेवक (Krushi Sevak Mandhan) हे सध्या कार्यरत असून त्यांना जेमतेम दरमहा 6000 रुपयांवर काम करावे लागत आहे. राज्यात कार्यरत कृषी सेवकांच्या मानधन वाढीची मागणी ही अनेक वर्षांपासून रखडलेली आहे गेल्या काही काळात मानधनवाढीच्या दृष्टीने बैठकांचे सत्र पार पडली तसेच त्यासाठी मंजुरीही मिळाल्याचे वृत्तही इतर माध्यमांमध्ये झळकल्याने राज्यातील सर्व कृषी सेवक हे आनंदी झाले होते मात्र याबाबत अद्याप पर्यंत कुठलाही आदेश निघाला नसल्याने राज्यातील सर्व कृषी सेवक हे सध्या मानधन वाढीचे प्रतीक्षेत होते.

 

राज्यामध्ये आरोग्यसेवक, शिक्षण सेवक आणि ग्रामसेवक या सर्वांचे मानधन वाढविण्यात आले परंतु कृषि सेवक यांचे मानधन कधी वाढणार हा सर्वात मोठा प्रश्न राज्यातील कृषि सेवकांपुढे होता परंतु आता तो निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. कारण, पुढील काही दिवसांमध्ये कृषि सेवक मानधन वाढ बाबत शासन निर्णय येणार आहे.

कृषी सेवक (Krushi Sevak Mandhan) यांच्या मानधन वाढी संदर्भात ऑक्टोबर मध्ये बैठकी ही झाली आणि या बैठकीमध्ये कृषी सेवक यांची रुपये 6000/- वरून 16,000/- रुपये मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने सादर केला होता परंतु अद्याप मानधन वाढीचा कोणताही शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नव्हता परंतु पुढील काही दिवसांमध्ये कृषि सेवक मानधन वाढ बाबत शासन निर्णय येणार आहे.

 

 

अधिक वाचा :

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

error: Content is protected !!