Kusum Solar Pump: कुसुम सोलर पंप योजना 2023 नवीन कोटा उपलब्ध झाला आहे | आपल्या जिल्ह्याचा कोटा चेक करून अर्ज सादर करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
1/5 - (1 vote)

कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump) ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जात असून या योजने अंतर्गत सध्या काही जिल्ह्यांमध्ये नवीन सोलर पंप कोटा उपलब्ध करण्यात आला असून त्या ठिकाणी अर्ज स्वीकारणे सुरू आहे. राज्यामध्ये सोलर पंप साठी बर्‍याच शेतकरी बांधवांकडून मागणी जास्त असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कोटा लवकरच समाप्त होत आहे. परंतु, शेतकरी बांधवांनी संकेतस्थळावर परत परत भेट द्यावी कारण लक्षांक नुसार कोटा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

Kusum Solar Pump
Kusum Solar Pump

 

 

तर, आज दिनांक 25 मे 2023 रोजी महाऊर्जा च्या कृसुम सोलर पंप (Kusum Solar Pump) साठी नवीन कोटा उपलब्ध झाला आहे त्यामुळे इच्छुक शेतकरी हे पोर्टल वर अर्ज सादर करू शकतात.

 

महाऊर्जा च्या संकेतस्थळावर अर्ज करताना अनेक अडचनिना सामना करावा लागत आहे कारण संकेतस्थळ हे एरर दाखवत आहे तर, अश्या परिस्थिति मध्ये शेतकरी बांधवांनी संकेतस्थळावर परत थोड्या वेळानं प्रयत्न करणे गरजेचे आहे. (Kusum Solar Pump) आणि अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे सर्व शेतकरी बांधवांनी तयार ठेवावीत जेणेकरून संकेतस्थळ व्यवस्थित सुरू झाले की लवकर पोर्टल वरती कागदपत्रे आपलोड करता येतील.

 

 

सोलर पंप  (Kusum Solar Pump) साठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल :

 

  1. सात बारा उतारा – विहीरीची नोंद असणे आवश्यक
  2. 8 अ उतारा
  3. आधार कार्ड
  4. लाभार्थी चा पासपोर्ट फोटो
  5. बँक खाते पासबूक
  6. सामाईक विहिरी असेल तर इतर खातेदारांचे ना हरकत दाखला

 

वरील प्रमाणे कागदपत्रे ही आवश्यक आहेत. तर, वरील सर्व कागदपत्रे ही काढून घ्यावीत आणि स्कॅन करून त्या पोर्टल वर आपलोड करण्यासाठी तयार ठेवावीत. पोर्टल वर अर्ज सुरू आहेत परंतु वेबसाइट ही व्यवस्थित चालत नसल्याने अर्ज करण्यास व्यत्यय येत आहे तरी प्रयत्न करत रहावेत.

 

अर्ज करण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ :  https://www.mahaurja.com/meda/

 

नवीन पंप नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

नोंदणी झाली आसेल तर लॉगिन करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

सूचना : अर्ज हा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच करावा

 

अधिक वाचा :

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

error: Content is protected !!