MahaDBT Sprinkler Drip: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर तुषार/ठिबक करिता निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला पुढील 7 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे आपलोड करणे बंधनकारक असते अन्यथा तो अर्ज रद्द करण्यात येतो. त्यामुळे निवड झाल्यानंतर कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ती आपण खालील प्रमाणे पाहू शकता.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Sprinkler Drip) वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:
- सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
- आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
- सात बारा वर सिंचन स्त्रोत नोंद नसेल तर स्वयंघोषणा पत्र
- अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र
- वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)
- आधार
- बँक खाते पासबूक
वरील प्रमाणे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपला अर्ज हा त्रुटि मध्ये येणारच नाही त्यामुळे निवड झाल्यानंतर वरील आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. MahaDBT Sprinkler Drip