Soybean Seed Treatment: अशी करा सोयाबीन बिजप्रक्रिया | रासायनिक आणि जैविक बिजप्रक्रिया
Soybean Seed Treatment: उत्तम बियाण्याची निवड करणे यासोबतच योग्य ती बिजप्रक्रिया करणे हे भरघोस पीक घेण्याच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे पिकाला विविध कीड व रोगांपासून वाचविण्यासाठी बिजप्रक्रिया ही महत्वाची आहे.
बीजप्रक्रिया म्हणजे काय?
बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते, याला बीजप्रक्रिया (Soybean Seed Treatment) असे म्हणतात.
बीजप्रक्रियेचे फायदे काय आहेत?
१. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
२. बियाण्याची उगवणक्षमता वाढते.
३. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
४. पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
५. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड/रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.
बुरशिनाशक बिजप्रक्रिया
सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून जसे की मुळकुज, खोडकुज पासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम वापरावे
किंवा
कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% मिश्र घटक 3 ग्राम प्रती किलो बियाणे
किंवा
4 ग्राम ट्रायकोडेर्मा भुकटी बियाण्यास चोळावी (Soybean Seed Treatment)
कीटकनाशक बिजप्रक्रिया
सोयाबीन पिकावरील खोडमाशी पासून संरक्षण करण्याकरिता आपण खालील कीटकनाशकाची बिजप्रक्रिया करावी
थायमिथोक्साम 34% FS हे 10 मिलि प्रती किलो बियाण्यास वापरावे
जिवाणू संवर्धक बिजप्रक्रिया
नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे (Rhizobium japonicum) रायझोबिअम 250 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू 250 ग्रॅम या जिवाणू संवर्धकाचे पाकिट प्रति 10 किलो सोयाबीन बियाण्यास वापरावे.
हेच जिवाणू संघ आपल्याकडे द्रवरूप असतील तर, 50 मिलि प्रती 10 किलो बियाणे याप्रमाणे वापरावे. (Soybean Seed Treatment)
बिजप्रक्रिया करण्याचा क्रम
सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी त्यानंतर कीटकनाशकाची आणि त्यानंतर किमान 1-2 तास अंतर ठेऊन जिवाणू संघाची बिजप्रक्रिया करावी.
बाजारात उपलब्ध नवीन संयुक्त बुरशिनाशक आणि कीटकनाशक?
आपण बुरशिनाशक आणि कीटकनाशक हे वेगवेगळे औषध बिजप्रक्रिया साठी वापरू शकतो किंवा सध्या बाजारात या दोघांचे एकत्र मिश्रण देखील उपलब्ध झाले आहे ते देखील आपण वापरू शकतो. आणि तसेच, या संयुक्त बुरशिनाशक आणि कीटकनाशक चा गतवर्षी शेतकरी बांधवांनी वापर करून छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
संयुक्त बुरशिनाशक आणि कीटकनाशक : अझॉक्सीस्ट्रोबिन 2.5% + थायोफेनेट मिथाइल 11.25% + थायोमेथोक्सम 25% एफएस
Insecticide and Fungicide Technical Name: Azoxystrobin 2.5% + Thiophanate Methyl 11.25% + Thiamethoxam 25% FS
बाजारातील व्यापारी नावे : इलेक्ट्रॉन (UPL कंपनी चे) किंवा कास्केड (SWAL कंपनी चे ), वार्डन (अग्रोलाइफ) या नावाने उपलब्ध आहे
वरील प्रमाणे आपण सोयाबीन साठी रासायनिक, जैविक बिजप्रक्रिया करू शकता.