MSP Procurement PSS : सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू | पहा आपल्या जिल्ह्यातील नाफेड खरेदी केंद्र
MSP Procurement PSS : केंद्र सरकार हे २०२४-२५ च्या हंगामात सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकांची हमीभावाने खरेदी करणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ही खरेदी राज्यात केली जाणार आहे. तर, यासाठी शेतकर्यांना त्यांच्या तालुक्यातील केंद्रा वरती जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
राज्यात सोयाबीन, मुग उडीद खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफने एकूण २०९ हमीभाव खरेदी केंद्रांना मंजूर दिली आहे. राज्यातील एकूण १९ जिल्ह्यात नाफेडची १९ खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तर एनसीसीएफची ७ जिल्ह्यांमध्ये ६३ खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रांवर दिनांक १० ऑक्टोबरपासून मुग आणि उडीद तर १५ ऑक्टोबरपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात येणार आहे. (MSP Procurement PSS)
किमान आधारभूत किंमत (PSS) योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग 8682, उडीद 7400 व सोयाबीन 4892 प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी केले जाणार आहेत. (MSP Procurement PSS)
शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग उडीद हमीभाव खरेदीचा लाभ घेण्याचं आव्हान मार्केट फेडरेशन केलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी ७/१२, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावा, असं आवाहन करण्यात आले आहे. (MSP Procurement PSS)
तर, काही जिल्हयांची खरेदी केंद्राची माहिती ही आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता आणि आपण नोंदणी करिता त्या केंद्राला भेट द्यावी. तसेच, आपण अधिक माहिती साठी आपल्या तालुक्यातील पणन महासंघ कार्यालयास भेट द्यावी. (MSP Procurement PSS)
परभणी तालुका सह खरेदी विक्री संघ, मोंढा परभणी , जिंतुर तालुका जिनींग ॲन्ड प्रेसींग सह सो. लि. जिंतूर , पूर्णा तालुका सह खरेदी विक्री संघ, मोंढा पूर्णा , मानवत तालुका सह खरेदी विक्री संघ, मार्केट यार्ड मानवत , स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सेवा सह संस्था, मार्केट यार्ड, पाथरी , स्वप्नभूमी सुशिक्षित बेरोजगार सेवा सह संस्था, सोनहारी वेअरहाउस, शेळगाव रोड, सोनपेठ , तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म. बोरी , तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म. बोरी, मार्केट यार्ड, सेलू .
पिकांची ऑनलाइन नोंदणीकरिता पणन महासंघाने जिल्ह्यात अकरा ठिकाणी केंद्र सुरू केले आहेत. यामध्ये अंबड तालुका खरेदी विक्री संघ, सेंटर अंबड, जडाई फार्मर्स प्रोड्युसर कंपनी रेवगाव सेंटर जालना, मे. पूर्णा केळणा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी बरंजळा सेंटर भोकरदन, नानसी शेतकरी धान्य अधिकोष बहुउद्देशीय सहसंस्था नानसी सेंटर मंठा, ॲग्रीटच फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. धोंडखेडा सेंटर माहोरा, श्री एकवीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सेंटर बदनापूर, श्री गणेश कृषी उपयोगी साहित्य पुरवठा शेती सह संस्था सेंटर परतूर, जीवरेखा ॲग्री प्रोड्युसर कंपनी लि. गणेशपूर सेंटर जाफराबाद, वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या. जानेफळ सेंटर अन्वा, वैष्णवी अभिवन सहकारी संस्था मर्या. जवखेडा खुर्द सेंटर राजूर (जवखेडा खुर्द), हर्षवर्धन कृषीविकास प्रोड्युसर कंपनी मर्या. लोणी सेंटर आष्टी या खरेदी केंद्रांचा समावेश आहे.
बुलडाणा, मेहकर, शेगाव, लोणार, संग्रामपूर येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती, साखरखेर्डा सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, चिखली येथे स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था, वरवट बकाल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, माटरगाव येथे शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, किनगाव जट्टू येथे बिबी फार्मर प्रो. कंपनी, आणि मोताळा येथे संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.
या खरेदी केंद्रात मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ, हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ, लोहा, कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट, तालुका खरेदी विक्री संघ, बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सहकारी संस्था, देगलूर, मृष्णेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. धनज (ता. मुखेड), सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. बेटमोगरा (ता. मुखेड), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सहकारी संस्था गणेशपूर (ता. किनवट), तिरुपती शहापूर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. वन्नाळी (ता. देगलूर), राधामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रातोळी (ता.नायगाव), अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), व श्रीजगदंब फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. जांब (बु) (ता. मुखेड) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. (MSP Procurement PSS)
आपल्या जिल्ह्यातील खरेदी केंद्र माहिती साठी आपण जिल्हा पणन महासंघ कार्यालयास भेट द्यावी.
* दि. 5 ऑक्टोबर ला “या” शेतकर्यांना मिळणार रु. 4000
* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर
* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?
* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…
Tags : nafed, nccf, nafed_procurement, soybean_procurement, soybean_msp, soyabin_procurement, nafed_nccf_esamruddhi_porta_procurement, soyabin_udid_moong_procurement, MSP Procurement PSS,