PM KISAN Scheme: शेतकरी बांधवानो लवकर e-KYC करा अन्यथा मिळणार नाही केंद्र शासनाचा 14 वा आणि राज्य शासनाचा पहिला हफ्ता | Namo Scheme
PM KISAN Scheme: देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN Scheme) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
आता महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (PM KISAN Scheme) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.
पात्र शेतकर्यांना केंद्र सरकारचा 14 वा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता हा जून महिन्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
खालील तीन काम केलेली असतील तरच मिळणार लाभ ;
1. e-KYC प्रमाणीकरण
2. बँक खाते आधार संलग्न करणे
3. भूमी अभिलेख/शेत जमीन पडताळणी
वरील पैकी काही शेतकरी बांधवांची ekyc किंवा आधार बँक संलग्न करावयाचे राहिले आहे की नाही हे कसे पहायचे तर त्यासाठी खालील माहिती पहा ;
1. गूगल प्ले स्टोअर वरुण PM-KISAN हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे (PM KISAN Scheme)
अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
2. त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे
3. लॉगिन केल्यानंतर Dashboard हा पर्याय निवडावा
4. पुढे आपल्याला ekyc, आधार बँक संलग्न आहे की नाही, आणि भूमी अभिलेख पडताळणी आहे की नाही ही माहिती आपल्याला दाखवेल.
5. यापैकी जे प्रलंबित आहे ते आपण केल्याशिवाय आपल्याला पुढील हफ्ता मिळणार नाही आहे. आणि हे सर्व ज्या शेतकरी बांधवांचे पूर्ण झाले आहे त्यांना पुढील हफ्ता मिळेल.
e-KYC प्रमाणीकरण कसे करावे? : येथे पहा
बँक खाते आधार संलग्न कसे करावे? : येथे पहा
भूमी अभिलेख/शेत जमीन पडताळणी? : येथे पहा
अधिक वाचा :
* “या” शेतकर्यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता
* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?
* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा
* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध
* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली
* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …