Soyabin Kapus anudan E-KYC : राज्यातील 19 लाख शेतकर्यांची ई-केवायसी बाकी | kyc केली तरच मिळणार अनुदान
Soyabin Kapus anudan E-KYC : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही सुरू झाली आहे.
सोयाबीन कापूस अनुदान योजना मध्ये सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. मात्र ही मदत शेतकर्यांना मिळण्यासाठी ‘केवायसी’ (क्नो यूवर कस्टमर) अर्थात, ‘पात्र लाभार्थी असल्याची पडताळणी’ पूर्ण करण्याची देखील अट आहे. त्यासाठी संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Soyabin Kapus anudan E-KYC)
परंतु, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ (Namo Shetkari Mahasanman Nidhi) योजनेची मदत मिळत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या केवायसीतून वगळण्यात आले आहे. त्या शेतकर्यांना या मध्ये ekyc करण्याची आवश्यकता नाही असे कृषि विभागाने संगितले आहे.
राज्यामध्ये एकूण 96 लाख पात्र शेतकर्यांपैकी 68 लाख शेतकर्यांनी संमतीपत्र आणि आधार प्रत जमा केले आहेत. तर, या 68 लाख शेतकर्यांपैकी 46 लाख शेतार्यांचे आधार क्रमांक हे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ (Namo Shetkari Mahasanman Nidhi) योजना मध्ये जुळले आहेत त्यामुळे त्यांची केवायसी झालेली आहे. तर, उर्वरित जवळपास 22 लाख शेतकर्यांची केवायसी झालेली नव्हती. (Soyabin Kapus anudan E-KYC)
परंतु, कृषि विभागातील कर्मचारी यांच्या मदतीने मागील दोन दिवसांत जवळपास 3 लाख शेतकर्यांची ekyc पूर्ण करण्यात आली आहे. तर आता एकूण 19 लाख शेतकरी हे ekyc करिता प्रलंबित आहेत.
तर, उर्वरित शेतकरी बांधवांनी आपली ekyc प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यावी त्या नंतरच हे अनुदान वितरण शक्य होणार असल्याची माहिती कृषि विभगाने दिली आहे. (scagridbt.mahait.org)
Ekyc कशी करावी? (Soyabin Kapus anudan E-KYC)
eKYC करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र वरती भेट द्या किंवा आपण खाली दिलेल्या लिंक वरुण ekyc पूर्ण करू शकता. (Soyabin Kapus anudan E-KYC)
अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी
* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…
Tags : soyabin kyc, scagridbt farmer login, mahadbt scagridbt, SCAGRIDBT.MAHAIT.ORG, Soyabin Kapus anudan E-KYC