Sugarcane FRP: ऊसाची नवीन एफआरपी जाहीर | केंद्र सरकारकडून हंगाम 2023-24 साठी ऊसाच्या दरात वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane FRP: काही दिवसांपूर्वी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक समितीने (CCEA) विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (MSP)/हमीभाव  Kharip MSP 2023-24 मध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती.

Sugarcane FRP

उसाच्या एफआरपीमध्ये वाढ (Sugarcane FRP)

 

खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यानंतर सरकारने आता ऊस दरात बदल केला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने पुढील हंगामासाठी (2023 – 24) उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात (Sugarcane FRP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक समितीने (CCEA) 2023-24 हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये (Sugarcane FRP) प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ जाहीर केली आहे त्यानुसार आता ऊसाची नवीन एफआरपीमध्ये ही रु. 315 प्रती क्विंटल ( रु. 3150/टन) झाली आहे.

 

 

ऊसाची एफआरपी म्हणजे काय?

एफआरपी याचा मराठी अर्थ होतो “रास्त आणि किफायतशीर दर”, सोप्या भाषेत ऊसाची एफआरपी म्हणजे साखर कारखान्यांनी ऊसाला दिलेला प्रतिटन दर होय.

 

 

अधिक वाचा :

* मंत्रिमंडळ बैठकीतील हेमोठे निर्णय

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

error: Content is protected !!