Soyabin Kapus anudan : राज्यातील “या” 65 लाख शेतकर्‍यांना 30 सप्टेंबर रोजी अनुदान वितरण | सोयाबीन कापूस अनुदान टप्पा-1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.5/5 - (2 votes)

Soyabin Kapus anudan : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही सुरू झाली आहे.

 

Soyabin Kapus Anudan 2023

 

सोयाबीन कापूस अनुदान योजना मध्ये सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. मात्र ही मदत शेतकर्‍यांना मिळण्यासाठी ‘केवायसी’ (क्नो यूवर कस्टमर) अर्थात, ‘पात्र लाभार्थी असल्याची पडताळणी’ पूर्ण करण्याची देखील अट आहे. त्यासाठी संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Soyabin Kapus anudan E-KYC)

 

Soyabin Kapus anudan सोयाबीन कापूस अनुदान टप्पा-1

 

राज्यामध्ये एकूण 96 लाख पात्र शेतकर्‍यांपैकी 68 लाख शेतकर्‍यांनी संमतीपत्र आणि आधार प्रत जमा केले आहेत. तर, या 68 लाख शेतकर्‍यांपैकी 65 लाख शेतार्‍यांचे आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये उद्या दिनांक 30 सप्टेंबर 2024 वार सोमवार रोजी 2500 कोटी रुपयांचे वितरण होणार असल्याची माहिती ही मा. अजित पवार यांनी कृषि पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमा मध्ये दिली आहे.  (Soyabin Kapus anudan)

 

 

तर, हा पहिला वितरण टप्पा असून पुढील टप्पा देखील जसे कागदपत्रे प्राप्त होतील त्या नंतर लवकरच वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. (Soyabin Kapus anudan)

 

 

सोयाबीन कापूस अनुदान ekyc केली का : अशी करा केवायसी 

 

 

कापूस साठवणूक बॅग : लॉटरी यादी पाहितली का …. येथे पहा 

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

 

Tags : MahaDBT Cotton Storage Bags, cotton picking bags, mahadbt_lottery_list, mahadbt_farmer_login, mahadbtfarmer lotterylist, mahadbt shetakri yojana, महाडीबीटी कापूस बॅग, महाडीबीटी शेतकरी,

error: Content is protected !!