Maharashtra Budget : अर्थसंकल्प मध्ये शेतकर्‍यांसाठी “या” महत्वाच्या घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Maharashtra Budget : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर, महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे या अर्थसंकल्पा कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

Maharashtra Budget

 

तर, या अर्थसंकल्प कडे सर्व शेतकरी बांधवांचे देखील लक्ष वेधले असून यामध्ये शेतकरी बांधवांसाठी काय घोषणा करण्यात आल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. (Maharashtra Budget)

 

अर्थसंकल्प (Maharashtra Budget)

 

>> महाराष्ट्र राज्यातील 47 लाख 41 हजार कृषि पंप ग्राहक आहेत. या सर्व शेतकऱ्यांची वीज माफीची सरकारची घोषणा आहे

 

>>स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत 2694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

 

>>जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामं पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटींच्या निधीची तरदूद करण्यात आली आहे.

 

>>एका रुपयात पीक विमा योजने अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकर्‍यांना 3504 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आलेली आहे.

 

>>खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ तर 1023 महसूल मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळाचे पंचनामे जलद गतीने व्हावेत यासाठी नागपुर येथील ई-पंचनामा चाचणी पद्धत यशस्वी झाल्याने ही पद्धत राज्यभर लागू करण्यात येईल.

 

>>नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे.

 

>>’गाव तिथं गोदाम’ योजनेसाठी 341 कोटींची तरतूद करणार

 

>>शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होण्यासाठी ‘मागेल त्याला सौर ऊर्जा पंप’ देण्यात येणार, 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळणार

 

>>शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार

 

>>गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये प्रती लिटर अनुदान सुरू राहील (Maharashtra Budget)

 

 

error: Content is protected !!