MahaDBT Farmer : उन्हाळी भुईमूग व तीळ बियाणे साठी मिळणार 100% अनुदान | या तारखेपर्यन्त अर्ज करा?
MahaDBT Farmer : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे उन्हाळी हंगाम 2024-25 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर उन्हाळी हंगामी पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर उन्हाळी पिकांचे अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर “राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ या पिकांचे समुहांतर्गत 100 % अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत. (mahadbt farmer summer crop seeds subsidy)
तर, सदर बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत भुईमुग पिकासाठी कोल्हापूर/सातारा/सांगली/ पुणे/अहिल्यानगर/नाशिक/धुळे या 8 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना व तीळ पिकासाठी जळगाव/लातूर/बीड/बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. तरी, शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करावेत. mahadbt farmer
अर्ज कोठे करावा? (MahaDBT Farmer)
बियाणे साठी महाडीबीटी च्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या घटका अंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमुग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्यासाठी मुदत?
इच्छुक शेतकऱ्यांना दि.07 फेब्रुवारी 2025 पासून दि. 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. तरी, वरील जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.”
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती
स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)
स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा
स्टेप 3: बियाणे औषधे व खते ही बाब निवडावी
स्टेप 4: आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा
स्टेप 5: अनुदान हवे असलेली बाब निवडावी
प्रमाणित बियाणे वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक
स्टेप 6: पिक निवडावे
स्टेप 7: पिकाचे वाण निवडावे
स्टेप 8: लाभ घ्यावयाच्या असलेले क्षेत्र निवडावे
स्टेप 9: अर्ज जतन करावा
स्टेप 10: मुख्य पृष्ठ वरती यावे
स्टेप 11: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 12: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा
वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाणे वितरण व एक प्रात्यक्षिक बियाणे वितरण साठी अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर केल्यानंतर बियाणे सोडत साठी अर्ज विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला भारताला त्याच्या मोबाईल संदेशा द्वारे सूचित करण्यात येईल. mahadbt farmer
* तूर हमीभावाने खरेदीसाठी मंजूरी | नोंदणी करण्यास सुरुवात…
* ७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल
* 1 एप्रिल पासून टप्पा 2 चे काम होणार सुरू | पोकरा प्रकल्प टप्पा 2
* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज
* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती