Livestock Farmer Scheme : केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. ही योजना पशुपालकांना पशुधनाच्या देखभालीसाठी कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देते. या योजनेत गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन, वराहपालन आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना लाभ मिळतो.
या योजनेंतर्गत १ लाख ६० हजार रुपयांपासून ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. तर या कर्जावर ९ टक्के व्याज आकारले जाते. परंतु, नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांसाठी केंद्र सरकार ३ टक्के आणि राज्य सरकार ४ टक्के असे एकूण ७ टक्के व्याज सवलत दिल्या जाते. तसेच, राज्य सरकारकडून बँकांना अतिरिक्त २ टक्के व्याज अनुदान मिळते. परिणामी, केंद्र-राज्य सरकार मिळून एकूण ९ टक्के सवलत देत असल्याने नियमित कर्जदारांना हे कर्ज शून्य टक्के व्याजदरावर मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, पशुधनाची चांगली देखभाल होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. (Livestock Farmer Scheme)
तर, जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखाद्वारे.
योजनेचा उद्देश काय आहे?
पशूपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देऊन शेतकऱ्यांप्रमाणेच पशूपालकांनाही कमी व्याजदरात कर्ज मिळावे, तसेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. (Livestock Farmer Scheme)
योजनेचे फायदे कोणते मिळणार?
या योजनेत केंद्र सरकार ३ टक्के, राज्य सरकार ४ टक्के त्याचबरोबर राज्य सरकारची अतिरिक्त २ टक्के अशी एकूण ९ टक्के व्याज सवलत केंद्र व राज्य सरकार मिळून देत असल्यामुळे पशूपालकांना पशू किसान क्रेडिट कार्ड कर्ज आता शून्य टक्के व्याजदरावर मिळणार आहे. (Livestock Farmer Scheme)
योजनेच्या अटी व शर्ती
>> कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड करणे बंधनकारक आहे.
>> प्रकल्पधारकाने यापूर्वी केंद्र, राज्य किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
>> तसेच सर्व पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे.
>> पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणे आवश्यक राहील.
योजनेसाठीची पात्रता काय आहे?
>> २५,००० पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी किंवा ५०,००० पर्यंत अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी पालन करणारे
>> ४५,००० किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे हॅचरी युनिट चालवणारे
>> १०० किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा असलेले
>> ५०० किंवा त्यापेक्षा कमी मेंढी / शेळी पालन करणारे
>> २०० किंवा त्यापेक्षा कमी वराह (डुक्कर) पालन करणारे पशुपालक
योजनेची पात्रता
>> पशुपालन व्यवसाय करणारा शेतकरी किंवा व्यक्ती असणे आवश्यक आहे.
>> दुग्ध, शेळी, मेंढी, कुक्कुट, डुक्कर किंवा मत्स्यपालन करणारे पात्र असतील
>> अर्जदाराकडे संबंधित पशुधन/युनिट असणे किंवा सुरू करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.
>> आधार कार्ड व वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
>> बँक खाते असणे आवश्यक आहे.
>> पूर्वी कर्ज घेतले असल्यास नियमित परतफेडीचा चांगला इतिहास असावा.
>> काही प्रकरणांत जमीनधारक असणे किंवा व्यवसायाचा पुरावा आवश्यक आहे.
>> सहकारी संस्था/स्वयं सहाय्यता गट (SHG) सदस्य देखील पात्र असतात.
आवश्यक कागदपत्रे
>> किसान क्रेडिट कार्ड
>> आधार कार्ड
>> भारत पशुधन पोर्टलवरील नोंदणी प्रमाणपत्र
>> बँक खाते तपशील,
>> जमीन किंवा पशूधनाचे कागदपत्रे
अर्ज प्रक्रिया
जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त हे या योजनेचे सनियंत्रण म्हणून काम पाहतात. आपण पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, राज्य सहकारी किंवा जिल्हा सहकारी बँकेत अर्ज करावा.
अर्ज करताना फॉर्म भरून आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पशुधनाची माहिती, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुक यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
तसेच अर्जदार संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्जही करू शकतात. योग्य माहिती व कागदपत्रे दिल्यास अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन कार्ड मिळण्यास मदत होते. (Livestock Farmer Scheme)
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
