Seed Subsidy Application : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे खरीप हंगाम 2026-27 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर खाईर्प पिकांचे अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे इच्छुक शेतकरी व शेतकरी गट जे आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता. (Seed Subsidy Application)
वैयक्तिक शेतकरी हे प्रमाणित बियाणे घटका म्हणजेच 40-50% अनुदान वरील बियाणे करिता अर्ज करू शकतील तर शेतकरी गट हे पीक प्रात्यक्षिक बियाणे म्हणजेच 100% अनुदान वरील बियाणे करिता अर्ज सादर करू शकतील. Seed Subsidy Application
वैयक्तिक शेतकरी अर्ज कसा कारायचा ?
स्टेप 1: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर वैयक्तिक शेतकरी मधून फार्मर id टाकून लॉगिन करावे (mahadbt login)

स्टेप 2: पुढे अर्ज करा हा पर्याय निवडावा
स्टेप 3: बियाणे औषधे व खते ही बाब निवडावी
स्टेप 4: आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा
स्टेप 5: अनुदान हवे असलेली बाब निवडावी
प्रमाणित बियाणे वितरण , पीक, निवडावे आणि क्षेत्र टाकावे

स्टेप 9: अर्ज जतन करावा
स्टेप 10: मुख्य पृष्ठ वरती यावे
स्टेप 11: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 12: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा
वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाणे वितरण व एक प्रात्यक्षिक बियाणे वितरण साठी अर्ज सादर करू शकता. Seed Subsidy Application
शेतकरी गटाचा अर्ज कसा कारायचा ?
स्टेप 1: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर शेतकरी गट मधून अध्यक्ष किंवा सचिव यांचा फार्मर id टाकून लॉगिन करावे (mahadbt login)
जर, आपण यापूर्वी गटाचा अर्ज केलेला असेल तर आपण अध्यक्ष यांचा फार्मर id टाकून लॉगिन होऊ शकतो. परत, नोंदणी करण्याची आवश्यकता नसते.

जर, आपण शेतकरी गटाचा प्रथमच अर्ज करत असाल तर आपण अध्यक्ष यांचा फार्मर id टाकून लॉगिन करावे, पुढे तुम्हाला गटाचे तपशील जसे की गटाचे नाव, सदस्य, अध्यक्ष नाव, सचिव नाव , अधिकृत सदस्य नाव विचारले जाईल हे सर्व टाकून otp पडताळणी करून घ्या. तसेच, तुम्हाला पोर्टल वर दिलेला फॉर्म प्रिंट काढून त्या ठिकाणी माहिती भरून तो अपलोड करावा लागेल.


स्टेप 2: पुढे अर्ज करा हा पर्याय निवडावा
स्टेप 3: बियाणे औषधे व खते ही बाब निवडावी

स्टेप 4: अर्ज जतन करावा
स्टेप 5: मुख्य पृष्ठ वरती यावे
स्टेप 6: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 7: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा
वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर प्रात्यक्षिक बियाणे वितरण साठी अर्ज सादर करू शकता. Seed Subsidy Application
अर्ज करण्यासाठी : महाडीबीटी पोर्टल लिंक
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
