Crop Insurance Declaration : खरीप हंगाम करीत पीकविमा अर्ज भरताना केंद्राने पीककर्ज नसल्याचे हमीपत्र बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे हमीपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांत यावर निर्णय होईल. तसेच कोणत्याही शेतकऱ्याचा विमा अर्ज यामुळे रद्द होणार नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. (Crop Insurance Declaration)
खरिपातील पीकविमा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण यंदा विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना शेवटी एक हमीपत्र द्यावे लागत आहे ते पुढील प्रमाणे आहे – ‘‘मी जाहीर करतो, की चालू हंगाम आणि वर्षासाठी संबंधित पीक आणि जमिनीच्या तुकड्यावर कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा सहकारी बँकेकडून कोणतेही किसान क्रेडिट कार्ड किंवा पीक कर्ज घेतलेले नाही. (Crop Insurance Declaration)
“नंतर असे आढळल्यास किंवा सिद्ध झाल्यास भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंमलबजावणी करणारी विमा कंपनी माझा अर्ज नाकारण्यास, माझी पॉलिसी रद्द करण्यास किंवा कोणतेही लाभ रोखून धरण्यास पूर्णपणे पात्र असेल. तसेच यासंदर्भात मी कोणताही आक्षेप, तक्रार किंवा दावा करणार नाही,’’ असे हमीपत्र शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. (Crop Insurance Declaration)
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण
पीकविमा अर्ज भरताना यंदाच असे हमीपत्र घेतले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विमा अर्ज भरला आणि नंतर पीककर्ज घेतल्यास अर्ज रद्द होईल, या भीतीने शेतकरी विमा अर्ज भरण्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ४ लाख ८० हजार इतकेच विमा अर्ज शेतकऱ्यांनी भरले आहेत. (Crop Insurance Declaration)
याबाबत कृषी विभागाचे केंद्राला पत्र
शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी हमीपत्राची अट काढून टाकावी, अशी विनंती करणारे पत्र राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पाठवले आहे. यासंदर्भातील नेमकी अडचण केंद्राच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे २ ते ३ दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
अर्ज रद्द होणार नाही : कृषी विभाग
पीकविमा योजना देशभरात राबविली जाते. अनेक राज्यांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. बिगर कर्जदार शेतकरी कमी असतात. त्यामुळे केंद्राने हे हमीपत्र सर्वच राज्यांसाठी लागू केले. पण महाराष्ट्रात पीकविमा काढण्यात बिगर कर्जदार शेतकरी जास्त आहेत. त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये. कोणत्याही शेतकऱ्याचा विमा अर्ज रद्द होणार नाही किंवा त्याचा लाभ रोखण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण कृषी विभागाकडून देण्यात आले आहे.
* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण
* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
