NDKSP Digital Currency Subsidy : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या म्हणजेच पोकरा प्रकल्पा च्या दुसऱ्या टप्प्यात ठिबक सिंचन संचासाठी अनुदान देताना ‘क्रेडिट कार्ड’ पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन प्रणाली मध्ये मंजूर अनुदानातील रक्कम डिजिटल चलनाच्या स्वरूपात वापरून उर्वरित रक्कम पुन्हा वापरण्याची सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
तर, ही नवीन प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर नाशिक, नागपूर आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) पद्धतीला मान्यता देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वितरित होणारे हे डिजिटल चलन आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे (NDKSP Digital Currency Subsidy)
पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून संच खरेदी करून नंतर अनुदान मिळत होते. मात्र, पैसे गुंतवणुकी अभावी अनेक शेतकरी योजना राबवू शकत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना पूर्वअनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NDKSP Digital Currency Subsidy)
तर, या नव्या प्रणालीत शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर ‘सीबीडीसी’ पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी डिजिटल वॉलेट तयार करून मंजूर अनुदानाइतकी रक्कम ‘टोकन’ स्वरूपात जमा केली जाईल. संबंधित शेतकरी नोंदणीकृत विक्रेत्याकडून ठिबक सिंचन संच खरेदी करताना क्यूआर कोडद्वारे ही रक्कम वापरू शकतील. मात्र, ही रक्कम अंतिम अनुदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विक्रेत्याला वापरता येणार नाही, अशी सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे. (NDKSP Digital Currency Subsidy)
कशी असेल नवीन पद्धत?
ठिबक सिंचन संच बसवल्यानंतर शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर बिले व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. एक एकरासाठी ५७,२४१ रुपयांचा मापदंड असून त्यातील ९० टक्के म्हणजे ५१,११७ रुपये अनुदान दिले जाते. ही रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये टोकन स्वरूपात दिली जाईल. उर्वरित रक्कम शेतकरी आणि विक्रेता यांच्यातील व्यवहार राहील. अंतिम मंजुरीच्या वेळी टोकन आणि प्रत्यक्ष मंजूर रकमेतील फरक असल्यास तो पंजाब नॅशनल बँकेमार्फत प्रकल्प खात्यात वर्ग केला जाईल. NDKSP Digital Currency Subsidy
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
