Posted in

Crop Loan : नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

Crop loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.2/5 - (4 votes)

Crop Loan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामासाठी पीककर्जाच्या नव्या मर्यादा जाहीर करण्यात आल्या असून, बहुतांश पिकांसाठी कर्जदरात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाढत जाणार्‍या शेतीखर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. कापूस, सोयाबीन, द्राक्षे, ऊस यांसह भाजीपाला आणि फळबागांसाठीही कर्ज रक्कम मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत.

 

२०२६-२७ हंगामासाठी कर्जवाटपाच्या मर्यादेत थेट १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मूळ कर्ज (Crop Loan) रकमेवर आधारित असून, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक निधी उपलब्ध होणार आहे. खत, बियाणे, शेत मजुरी आणि इतर काही इनपुट खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक ठरली होती आणि त्यानुसार आता त्यात वाढ करण्यात आली आहे. Crop Loan

 

भाजीपाला पिकांसाठी कर्ज?

कांदा, टोमॅटो यांसारख्या नगदी पिकांसाठी यंदा प्रतिहेक्टर १.२५ लाख ते १.८० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या पिकांसाठी उत्पादन खर्च जास्त असल्याने कर्जमर्यादेत वाढ केल्याने शेतकऱ्यांना लागवड आणि देखभाल सुलभ होणार आहे.

 

कापूस, सोयाबीनसाठी कर्ज?

जिल्ह्यातील प्रमुख पिकांपैकी कापूस आणि सोयाबीनसाठीही कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

कापूस (ओलीत) – ७८,७५० रुपये प्रति हेक्टर

कापूस (कोरडवाहू) – ६३,००० रुपये प्रति हेक्टर

सोयाबीन : – ६८,२०० रुपये प्रति हेक्टर

ही मर्यादा लक्षात घेऊन बँका पीककर्जाचे वाटप करणार आहेत.

 

डाळी व धान्य पिकांनाही दिलासा

तूर – ६६,००० रुपये प्रति हेक्टर

ज्वारी – ४२,७०० रुपये प्रति हेक्टर

मूग व उडीद – ३७,५०० रुपये प्रति हेक्टर

या निर्णयामुळे विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

 

फळबागांसाठी मोठी तरतूद

फळबागा हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा भाग असल्याने त्यांच्या देखभालीसाठी मोठा खर्च येतो. यासाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. संत्रा, मोसंबी, आंबा, द्राक्षे, डाळिंब, केळी यांसारख्या बागांसाठी प्रतिहेक्टर १.२५ लाख ते २.५० लाख रुपयांपर्यंत कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे फळबाग उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. Crop Loan

 

इतर पिकांसाठीही वाढीव कर्ज

मिरची, केळी, पपई, भाजीपाला यांसारख्या पिकांसाठीही वाढीव कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

मिरची – सुमारे १.२६ लाख रुपये

केळी – सुमारे १.८९ लाख रुपये

पपई – सुमारे १.०७ लाख रुपये

डाळिंब – सुमारे १.५२ लाख रुपये

यामुळे विविध प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. तसेच, योग्य वेळी कर्ज उपलब्ध झाल्यास शेतकरी वेळेवर पेरणी व इतर कामे करू शकतील. Crop Loan

टीप : वरील कर्ज रकमा ह्या जिल्हयानुसार बदल होऊ शकतो

 

 

हे पण पहा :

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर

* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार

* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही

* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६

* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खुशखबर

error: Content is protected !!