Bhausaheb Fundkar Falbag Lagwad: फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान | पहा किती मिळणार खतांसाठी अनुदान?
सन 2023 मध्ये राज्यामध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad) राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. तसेच, राज्याचे कृषि मंत्री यांनी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फळबागे साठी आवश्यक खतांसाठी 100% अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
राज्यामध्ये चालू वर्षात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad) ही राबविणे सुरु आहे परंतु या योजनेमध्ये शेतकर्यांना फक्त खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, नांग्या भरणे आणि पीक संरक्षण, ठिबक सिंचन या बाबी साठी अनुदान देण्यात येत होते. परंतु, यामध्ये फळबागे साठी जे खते लागतील ती लाभार्थ्याने स्वखर्चाने करण्याचे प्रस्तुत होते परंतु आता या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती ही कृषि मंत्री यांनी दिली होती.
आता ठिबक सिंचनाचे अनुदान हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad) ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.
शासन निर्णय
तर, दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खालील बदल करण्यात आले आहेत.
१) सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत “ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबी ऐवजी “रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाव समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२) तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात येत आहे.
३) यापूढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये (परिशिष्ट-अ) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
(Bhausaheb Fundkar Falbag Lagwad)
आता किती मिळणार अनुदान?
तर, नवीन शासन निर्णयानुसार आता खते देणे या बाबी साठी मजुरी आणि सामुग्री अशी एकूण फळपीक निहाय खालील प्रमाणे अंदाजपत्रक रकमेत वाढ करण्यात आली आहे.
फळपीक | नवीन शा.नि नुसार खते देणे बाबी साठी समाविष्ट हेक्टरी अनुदान रु. |
आंबा 5×5 | 10067 |
आंबा 10×10 | 6430 |
चिंच | 5765 |
चिकू | 5593 |
लिंबू | 8174 |
डाळिंब | 9810 |
दिनांक 21/09/2023 रोजीचा शासन निर्णय : डाऊनलोड करा
#Bhausaheb Fundkar Falbag Lagwad,
अधिक वाचा :
* शेतकर्यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा
* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी
* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली
* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार
* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त
* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा
* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023