Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील या 41 मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार अग्रिम | पहा किती मिळणार पीक विमा 25% अग्रिम रक्कम?  Mid-Season Adversity

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन २०२३-२४ पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तर, या वर्षी राज्यामध्ये पीक विमा योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील बर्‍याच शेतकरी बांधवांनी पीक विमा हा उतरविला आहे.

 

parbhani crop insurance pik vima

 

परभणी जिल्ह्यात यंदाच्या  पावसाळ्यात जिल्ह्यातील 11 मंडळां मध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनी, कृषी विभाग यांच्या उपस्थितीत पीक परिस्थितीचे सर्व्हे पूर्ण करण्यात आले होते. तसेच याबाबतची आवश्यक अधिसूचना काढण्यात देखील काढण्यात येऊन 25 टक्के अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता परंतु जिल्ह्यातील एकूण 52 मंडळापैकी उर्वरित 41 मंडळ हे 21 दिवसांपेक्षा कमी खंड असल्यामुळे पात्र केले नव्हते (Crop Insurance)

 

 

परंतु, त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी कृषि विभागाला पिकांचे सर्वेक्षण करून पावसातील खंडाचा पिकाच्या उत्पादनात होणारी घट याविषयी अहवाल देण्याचे कळविले होते. त्यानुसार कृषि विभागाने दिनांक 06 सप्टेंबर रोजी मा जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अहवाल सादर केला असून त्यामध्ये उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट होण्याचा अंदाज कळविला आहे. (Crop Insurance)

 

 

तर, वरील अहवाल नुसार आता मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी परभणी जिल्ह्यातील खालील 41 मंडळातील सोयाबीन पीक विमा भरलेल्या शेतकर्‍यांना 25% अग्रिम रक्कम ही पूढील एक महिन्या च्या आत देण्याच्या सूचना ह्या विमा कंपनी ला देण्यात आल्या आहेत. (Crop Insurance). अग्रिम रक्कम ही अंदाजे रु. 7500 ते 8000 प्रती हेक्टर अशी असेल. 

 

 

 

परभणी जिल्ह्यातील उर्वरित 41 मंडळ खालील प्रमाणे आहेत.

 

 

parbhani circle crop insurance

 

 

अधिक वाचा :

* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन

* ज्या शेतकर्‍यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा

error: Content is protected !!