Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील या मंडळातील शेतकर्यांना मिळणार इतकी रक्कम? पहा किती मिळणार पीक विमा 25% अग्रिम रक्कम? Mid-Season Adversity
Crop Insurance: सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन २०२३-२४ पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तर, या वर्षी राज्यामध्ये पीक विमा योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील बर्याच शेतकरी बांधवांनी पीक विमा हा उतरविला आहे.
परभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील 11 मंडळां मध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनी, कृषी विभाग यांच्या उपस्थितीत पीक परिस्थितीचे सर्व्हे पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच याबाबतची आवश्यक अधिसूचना काढण्यात देखील काढण्यात आली असून 25 टक्के अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती परभणी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. Crop Insurance
परभणी जिल्ह्यात जून व जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला त्यात दिनांक 29 जुलै ते 19 ऑगस्ट असे सलग 21 ते 22 दिवस पावसाचा खंड पडला. परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर, दैठणा (ता.परभणी), जिंतूर (ता.जिंतूर), केकरजवळा (ता. मानवत), पाथरी, बाभळगाव (ता. पाथरी), रावराजूर (ता. पालम), लिमला, ताडकळस (ता. पूर्णा), सेलू (ता. सेलू), पेठशिवणी (ता. पालम) या 11 मंडळामध्ये पावसाचा खंड (Crop Insurance) पडला होता.
तर, 2.5 मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झालेला दिवस हा पावसाचा खंड म्हणून गृहीत धरला जातो. त्यामुळे वरील नमूद जिल्ह्यातील मंडळामध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम (मिड सीझन) प्रतिकूल परीस्थिती या बाबी अंतर्गत शेतकर्यांना 25 टक्के अग्रिम पीकविमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक अधिसूचना जिल्हाधिकार्यांनी काढली होती आणि त्यानुसार आता जिल्ह्यातील 11 मंडळातील सोयाबीन पीक विमा उतरवलेल्या शेतकर्यांना अग्रिम रक्कम ही पुढील एक महिन्यात देण्याच्या सूचना ह्या जिल्हाधिकारी यांनी कंपनीला दिल्या आहेत. Crop Insurance
तर, जिल्ह्यातील खालील प्रमाणे नमूद मंडळा मधील शेतकर्यांना खालील प्रमाणे हेक्टरी रक्कम मिळणार आहे.
अधिक वाचा :
* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान
* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू
* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन
* ज्या शेतकर्यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा
* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती