Crop Damage Compensation : ऑगस्ट व सप्टेंबर 2024 अतिवृष्टी/पूर यामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर | या जिल्ह्यातील शेतकर्यांना लाभ?
Crop Damage Compensation : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (10५ 50309) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि.२७.०३.२०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने दि.३०.०१.२०१४ अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणार्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. (Crop Damage Compensation)
तसेच, दि.२२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्र.३ येथील दि.०१.०१.२०२४ च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. (Crop Damage Compensation)
ऑगस्ट व सप्टेंबर, २०२४ या महिन्यात “अतिवृष्टी/पूर” यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर, २०२४ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.९९७०४.३६ लक्ष (अक्षरी रुपये नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लक्ष छत्तीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. (Crop Damage Compensation)
तर, माहे ऑगस्ट व सप्टेंबर, २०२४ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधि मंजूर झाला असून लवकरच हा निधि आता शेतकरी यांच्या खात्यावर वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. (Crop Damage Compensation)
शासन निर्णय : येथे पहा/डाऊनलोड करा
* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?
* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…