Crop Insurance : कापणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले असल्यास अशी नोंदवा तक्रार | पीक विमा 2024
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकरी यांचे परती च्या पाऊसामुळे शेतात पाणी साचून उभ्या/काढणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीला 72 तासाच्या आत मध्ये कळवावे, त्याकरिता खालील पद्धतीचा वापर करू शकता.
1. कृषि रक्षक हेल्पलाइन क्रमांक्र (Crop Insurance)
तक्रार करण्यासाठी आपण टोल फ्री क्रमांक्र 14447 यावरती आपण कॉल करून आपल्या पीक नुकसानीची तक्रार दाखल करू शकतो.
2. Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप)
Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) ॲपद्वारे सुचना देणे सोईचे आहे, नुकसान सूचना दिल्या नंतर आपल्याला पावती स्वरूपात डॉकेट नंबर मिळतो, तरी ॲप डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकचा वापर करावा
Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) डाउनलोड करा
खालील पद्धतीने नोंदवा पीक नुकसानीची तक्रार >>
स्टेप 1: प्ले स्टोअर मधून Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) ॲप डाउनलोड करावे
स्टेप 2: ॲप उघडल्या नंतर Continue as Guest हा पर्याय निवडावा
स्टेप 3: Crop Loss / पीक नुकसान हा पर्याय निवडावा
स्टेप 4: Crop Loss Intimation / पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा
स्टेप 5: मोबाइल क्रमांक टाकावा
स्टेप 6: ओटीपी प्राप्त करून सादर करावा
स्टेप 7: हंगाम – खरीप, वर्ष-2024 , योजना आणि राज्य निवडावे
स्टेप 8: नोंदनिचा स्त्रोत CSC निवडावा आणि आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का? या समोरील रेडियो बटन क्लिक करावे आणि विमा पावती क्रमांक टाकावा आणि Done करावे.
स्टेप 9: पुढे विमा पावती क्रमांक वरती टिक करावे
स्टेप 10: पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल
स्टेप 11: ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार करवायची आहे तो अर्ज निवडावा (प्रत्येक गटा करिता स्वतंत्र तक्रार करावी)
स्टेप 12: पुढे घटनेचा प्रकार – Excess Rainfall किंवा Inundation निवडावा, घटनेचा दिनांक – ज्या दिवशी पावसाने नुकसान झाले आहे तो दिनांक टाकावा,
पीक वाढीचा टप्पा – Harvested (कापणी स आलेले परंतु उभे पीक)
किंवा Cut & Spread/Bundled condition for drying (कापणी करून जमिनीवर वाळवीन्यासाठी पसरवून ठेवेलेले)
निवडावा आणि नुकसान टक्केवारी टाकावी.
स्टेप 13: बाधित पिकाचा फोटो घ्यावा
स्टेप 14: आणि Submit/सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 15: त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरीत्या दाखल होईल आणि एक Docket id मिळेल तो जतन करून ठेवावा.
तर अशा प्रकारे आपण पीक नुकसानीचा क्लेम मोबाइल वरून दाखल करू शकता.
पीक विमा नुकसान तक्रार पद्धती : माहिती पुस्तिका डाऊनलोड करा
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…
* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस
* “या” तारखेपासून शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान
* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज