असे करा मिलिपीड/वाणू/पैसा किडीचे नियंत्रण | How to control Millipedes?
Millipedes : मिलिपीड/वाणू/पैसा ही एक निशाचर कीड असून, सामान्यतः पिकांची पाने, काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती इ. वर उपजीविका करते. ही कीड सामान्यतः जमिनीवर पडलेल्या कुजलेल्या काडीकचऱ्याच्या विघटनामध्ये मदत करणारा सजीव आहे. मात्र ह्या किडींची संख्या वाढल्यानंतर अंकुरलेल्या बिया, रोपांचे नुकसान करतात. त्यांनी कुरतडल्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची देखील वेळ शेतकर्यांवर येऊ शकते. त्यामुळे, या किडीचे प्रादुर्भाव दिसताच नियंत्रण करणे आवश्यक आहे. Millipedes
मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उपलब्ध पाणी किंवा पावसावर पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशा पिकांवर सुरुवातीच्या काळात मिलीपीड/पैसा /वाणी Millipedes या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे येथील शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असते.
Millipedes
मिलीपीड/पैसा /वाणी नियंत्रण करिता करावयाच्या उपाययोजना :
1. पैसा रात्री जास्त सक्रीय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले मिलीपेड्स जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.
2. ज्याठिकाणी शेतक-यांनी पेरणीपुर्वी बियाण्याला बिजप्रक्रीया केली आहे तेथे प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
3. चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.
4. पैसा किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन (५ टक्के एसपी) १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. सदर कीडनाशकाची शिफारस मिलीपीड साठी नाही, परंतु कापूस पिकामध्ये आहे.
5. कार्बोसल्फान (६ टक्के दानेदार) किंवा क्लोरपायरीफॉस (१० टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे. सदरील कीटकनाशके परिणामकारक आहेत परंतु लेबल क्लेम नाहीत. Millipedes
6. पेरणी झाल्यावर रोप उगवल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ३७.५ मिलि प्रति १० लिटर पाणी या द्रावणाचे ड्रेंचिंग करावे. पंपाचे नोझल सैल करून रोपांभोवती वर्तुळाकार किंवा सरळ ओळीत प्रति एकरी ४० पंपाचे ड्रेंचिंग पुरेसे होईल.
तर, शेतकरी बांधवानो आपल्या शेतात मिलिपीड/पैसा कीडीचा प्रादुर्भाव असेल तर वरीलप्रमाणे नियोजन करावे.
* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज
* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना
* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)
* पीक पेरा खरीप 2024 PDF डाऊनलोड करा | पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf | Pik pera form pdf format
* महाडीबीटी तुषार, ठिबक लॉटरी यादी डाऊनलोड करा | जून 2024 सोडत यादी