Ladki Bahin Yojana Update : तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट
Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले होते. या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा येत आहेत.
परंतु, आता या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांच्या अर्जा समोर संजय गांधी हा कॉलम दिसतं आहे यामध्ये Yes किंवा No हा ऑप्शन दाखवण्यात येत आहे. यामुळे सर्व अर्जदार हे गोंधळून गेले आहेत. कारण यामध्ये ज्यांच्या नावासमोर No हा पर्याय आहे त्यांना काळजी करण्याची काही गरज नाही परंतु ज्यांच्या नावापुढे Yes हा पर्याय आला आहे त्यांना मात्र पुढील हाफता मिळणार की नाही यावर अद्याप तरी शासनाकडून कोणती माहिती प्राप्त नाही. (Ladki Bahin Yojana Update)
परंतु, शासनाने योजनेमध्ये अर्ज करताना आपण एक हमीपत्र देखील आपलोड करून घेतले होते आणि त्यामध्ये असे स्पष्ट होते की मी कोणत्याही इतर शासकीय योजनेचा 1500/- पेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत नाही, तसेच माझे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नाही , तसेच माझ्या घरातील सदस्य हा शासकीय कर्मचारी नाही असे या हमीपत्र मध्ये आपण स्वाक्षरी करून सादर केले आहे. (Ladki Bahin Yojana Update)
त्यामुळे आता इतर योजनांचा डाटा तपासून लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज छाननी होत आहे आणि यामध्ये जे लाभार्थी हे इतर योजना मध्ये लाभ घेत आहेत त्यांना पुढे शासन लाभ देणार की नाही याबाबत मात्र अद्याप शासन स्तरावरून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (Ladki Bahin Yojana Update)
परंतु, ज्या महिला संजय गांधी निराधार योजना मध्ये लाभ घेत आहेत त्यांच्या नावापुढे Yes हा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कदाचित असे अर्ज रद्द केल जाऊ शकतात किंवा यांचे पुढील हफ्ते बंद केले जाऊ शकतात. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती ही शासनाकडून प्राप्त झाली नसून पुढील काही दिवसांत याबाबत माहिती समोर येईल.
लाडकी बहीण योजना स्टेटस चेक करा
लाडकी बहीण योजना चे किती हफ्ते मिळाले, कोणत्या बँकेत जमा झाले आणि कोणत्या तारखेला जमा झाले हे आता आपण लाडकी बहीण योजना पोर्टल वर लॉगिन करून पाहू शकता.
लाडकी बहीण योजना : पोर्टल लिंक
Tags : Ladki Bahin Yojana Online Apply, Ladki_Bahin_Yojana, ladki_bahin_yojana_arj, ladki_bahin_yojana_update, Ladki Bahin Yojana Update,
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर
* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी
* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार
* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू