MahaDBT Cotton Storage Bags : महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.5/5 - (4 votes)

MahaDBT Cotton Storage Bags : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती कापूस साठवणूक बॅग वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात  आले होते. तर, या कापूस साठवणूक बॅग ची सोडत ही महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 27 सप्टेंबर रोजी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये ज्या शेतकर्‍यांची निवड झाली आहे त्यांना कृषि विभागा कडून कापूस साठवणूक बॅग ह्या लवकरच वितरित केल्या जाऊ शकतात. 

 

Mahadbt Cotton Storage Bags

 

 

कापूस शेतीत कापूस वेचणी करताना त्याची साठवणूक करणे हे काम जिकरीचे ठरते त्यामुळे शेतकर्‍यांना कापूस वेचणी करताना विशिष्ट स्वरूपाची एक तात्पुरत्या साठवणुकी साठी कापूस साठवणूक बॅग (MahaDBT Cotton Storage Bags) विकसित करण्यात आली आहे. तर, ही बॅग आता कृषि विभागाच्या मार्फत महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या शेतकर्‍यांना मोफत पुरविण्यात येणार आहे. 

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल ऑनलाइन प्राप्त अर्जा मधून सोडत काढण्यात आली असून त्या सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांना कापूस साठवणूक बॅग ही 100% अनुदानावर म्हणजेच मोफत देण्यात येणार आहेत. तर, निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि कार्यालय येथे कापूस साठवणूक बॅग उचल करण्यासाठी संपर्क करावा. 

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे निवड झालेल्या शेतकर्‍यांना त्यांनी नमूद केलेल्या क्षेत्रा नुसार कापूस साठवणूक बॅग देण्यात येणार आहेत.  (MahaDBT Cotton Storage Bags)

 

 

1. 0.40 हे क्षेत्र असेल तर  — 3 कापूस साठवणूक बॅग

2. 0.80 हे क्षेत्र असेल तर  — 6 कापूस साठवणूक बॅग

3. 1.00 हे क्षेत्र असेल तर  — 8 कापूस साठवणूक बॅग

 

 

तर, आपल्या जिल्ह्याची कापूस साठवणूक बॅग सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी आपण खालील लिंक वरती भेट द्या : 

 

Clickhere Click

 

 

जिल्हा निहाय कापूस साठवणूक बॅग : लॉटरी यादी डाऊनलोड करा

 

 

 

Tags : MahaDBT Cotton Storage Bags, cotton picking bags, mahadbt_lottery_list, mahadbt_farmer_login, mahadbtfarmer lotterylist, mahadbt shetakri yojana, महाडीबीटी कापूस बॅग, महाडीबीटी शेतकरी,

 

हे पण पहा :

 

* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

error: Content is protected !!