Kusum Solar Scheme: कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाची होत आहे छाननी | कागदपत्रे त्रुटि बाबत संदेश आला त्यांनी लवकर हे काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Kusum Solar Scheme: दिनांक 17 मे पासून कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू झाले होते. आणि या पोर्टल वर इच्छुक शेतकर्‍यांकडून अर्ज सादर करण्यात आले होते.

 

kusum solar scheme new update

 

महाऊर्जा पोर्टल वर अर्ज करताना सात बारा वर विहीर, बोअर वेल ची नोंद असणे आवश्यक होते तसेच सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोत असेल तर त्याबाबत चे इतर खातेदारांचे ना हरकत अपलोड करणे आवश्यक होते परंतु काही शेतकरी बांधवांनी अर्ज सादर करण्यासाठी कमी वेळ आणि कोटा संपण्याची भीती मुळे अर्ज हे इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड न करता पोर्टल वर सादर केले. Kusum Solar Scheme

 

 

परंतु, आता सादर करण्यात आलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे यामध्ये ज्याप्रमाणे अर्ज सादर करण्यात आले आहेत त्यानुसार त्या क्रमांकाने छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये ज्यानि विहीर, बोअर वेल ची नोंद नसलेले 7/12 उतारा किंवा सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोत बाबत इतर खातेदारांचे ना हरकत अपलोड केले नाही त्या शेतकर्‍यांना त्यांच्या त्रुटि बाबत नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले आहेत आणि त्यांना दोन दिवसांत त्रुटि पूर्ण करण्याचे सूचित करण्यात आले आहे. Kusum Solar Scheme

 

 

ज्या शेतकर्‍यांना त्रुटि पूर्ण करण्या बाबत चा संदेश आला आहे त्यांनी त्रुटि पूर्ण करण्यासाठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर लॉगिन करावयाचे आहे आणि आवश्यक कागदपत्रे ही परत अपलोड करून सबमिट करावायची आहेत. Kusum Solar Scheme

 

 

सर्वसाधारण त्रुटि ह्या खलील प्रमाणे आहेत :

  1. विहीर, बोअर वेल ची नोंद नसलेले 7/12 उतारा
  2. सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोत बाबत इतर खातेदारांचे ना हरकत

 

 

त्रुटि पूर्ण करण्यासाठी येथे लॉगिन करा : लॉगिन करा

 

अधिक वाचा :

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

error: Content is protected !!