Posted in

PM Dhan Dhanya Krishi Yojana : “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना” | शासन निर्णय २१ एप्रिल, २०२६

PM Dhan Dhanya Krishi Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4/5 - (2 votes)

PM Dhan Dhanya Krishi Yojana : केंद्र शासनाने सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये कमी उत्पादनक्षमता, मध्यम पीक तीव्रता आणि सरासरी पेक्षा कमी कर्जवाटप असलेले देशातील शंभर आकांक्षित जिल्हे प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजनेखाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कृषि उत्पादनात वाढ करणे, पिकांमध्ये विविधता वाढवणे व शाश्वत कृषि पद्धतीचा पुरस्कार करणे, ग्रामपंचायत व तालुका पातळीवर साठवणूक क्षमता वाढविणे, सिंचन सुविधांमध्ये वाढ करणे आणि अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज सुविधा उपलब्ध करुन देणे हे या योजनेचे उद्देश आहेत. सदर योजना ५ वर्षांच्या कालावधीसाठी विद्यमान केंद्र व राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे राबविली जाणार आहे. (PM Dhan Dhanya Krishi Yojana)

 

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या देशभरातील शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना राबविण्यास मान्यता देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. (PM Dhan Dhanya Krishi Yojana)

 

त्यानुसार, महाराष्ट्रातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व बीड या ९ जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता शासन निर्णय २१ एप्रिल, २०२६ नुसार देण्यात आली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समित्या गठित करण्यात येणार आहेत.

 

 

योजनेचा उद्देश

>> कृषि उत्पादनात वाढ करणे

>> पिकांमध्ये विविधता वाढवणे व शाश्वत कृषि पद्धतीचा पुरस्कार करणे

>> ग्रामपंचायत व तालुका पातळीवर साठवणूक क्षमता वाढविणे

>> सिंचन सुविधांमध्ये वाढ करणे

>> अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज सुविधा उपलब्ध करुन देणे

 

 

शेतकर्‍यांना मिळणारे लाभ

>> सिंचन सुविधा मिळणार : विहीर, तुषार, ठिबक, पम्प

>> ग्रामपंचायत स्तरावर धान्य गोदाम

>> अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज

 

 

Seed Subsidy Application

 

शासन निर्णय : येथे पहा

 

हे पण पहा :

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६

* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खुशखबर

* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी 

* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?

* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?

error: Content is protected !!