गहू साठवणूक करताय… तर मग कीड लागू नये म्हणून करा हे उपाय Wheat grain protection while storage insects

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात नवीन गहू Wheat grain protection हा बाजारात आणला जातो आणि शेतकरी, गृहिणी यांची हा गहू साठवणूक  करण्यासाठी तयारी सुरू करतात. जवळपास अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी लागणारा गहू, तांदूळ, आणि इतर आवश्यक धान्यांची साठवणूक केली जाते. जवळपास सर्वच मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू घरात साठवणूक करतो परंतु साठवणूक केलेल्या गव्हाला अनेकदा कीड लागते आणि त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे, कोणत्याही धान्याची साठवणूक किंवा गहू साठवणूक करुन ठेवायची असेल तर त्याची विशेष काळजी घेणे तितकंच गरजेचं असते.

 

तेव्हा योग्य वेळीच काळजी घेतल्यास गव्हाचे नुकसान टाळता येऊ शकते. तर, आपण जाणून घेऊया गहू साठवणूक करीत असलेल्या गव्हाला कीड लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी पुढीलप्रमाणे.

Wheat grain protection while storage गहू साठवणूक करताय... तर मग कीड लागू नये म्हणून करा हे उपाय

गव्हाला किडीची लागण कशामुळे होते ?

 

गव्हात जर आद्रतेचे प्रमाण जास्त असेल तर अशा प्रकारच्या असलेल्या गव्हाला कीड ही लवकर लागते. म्हणून, गहू शेतात मळणी केल्यावर किंवा घरी आणल्यावर 2 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळत घालावे, त्यामुळे गव्हातील आद्रता ही संपूर्ण नष्ट होईल व कीड लागण्याची शक्यता ही कमी होईल.

 

 

गहू साठवणूक करण्यापूर्वी खालील नमूद विषयी आवश्यक ती काळजी घ्यावी.

 

1) गहू साठवणूक करण्यासाठी ओलावा विरहित अशा सुरक्षित जागेची निवड करा.

2) गहू साठवण्यासाठी लोखंडी पत्र्यापासून पासून बनवलेल्या सुधारित कोठीचा वापर करावा. यामुळे धान्य साठवणुकीच्या कोठीला कोणत्याही प्रकारची कीड, उंदीर आणि तसेच ओलाव्यापासून देखील आपल्याला संरक्षण करता येईल.

3) गहू साठवणुकीसाठी लोखंडी कोठी जर आपल्याकडे नसेल तर पोते ही स्वच्छ व साफ करून त्यात गहू भरावेत व पोते ही लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या कागदावर ठेवावेत. असे केल्याने गव्हाचे जमिनीवरील ओलाव्यापासून संरक्षण करता येईल.

4) पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने पोती पॉलिथिनच्या कागदावर झाकून ठेवावेत जेणेकरून धान्य सुरक्षित राहण्यास मदत होईल.

 

नक्की वाचा : स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

गव्हाला किडीची लागण होऊ नये करिता करावयाचे उपाय

 

१) कडुलिंबाची पाने :

 

गव्हाला लागणारी कीड ही आपण बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून रोखू शकतो. यासाठी कडुलिंबाची पाने ही सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. ही वाळलेली पाने प्लॅस्टिक किंवा कापडाच्या पिशवीत भरून घ्यावीत. त्या अगोदर पिशवीला लहान छिद्र पाडावीत किंवा मग आपण पाने ही कापडात बांधावीत. आता, ही पिशवी धान्याच्या पोत्या मध्ये किंवा कोठी मध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवावीत. कडुलिंबाच्या पानांच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागणार नाही.

 

 

२) लसूण :

 

लसणा मुळेदेखील धान्यांना कीड लागण्यापासून रोखू शकतो. त्यासाठी लसणाची साल ही न काढता एक संपूर्ण लसणा ची गड्डी ही साठवणुकीच्या धान्यामध्ये ठेवावी. त्यामुळे धान्याला कीड लागणार नाही.

 

३) लाल मिरच्या :

लाल मिरच्यांचाही वापर करूनही आपण किडींचा प्रादुर्भाव रोखू शकतो. यामध्ये लसणाप्रमाणेच कृती करायची आहे. केवळ लसणाच्या ऐवजी आपल्याला प्रत्येक थराला चार पाच लाल सुकलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत ही पद्धत देखील अत्यंत प्रभावी आहे यामुळे देखील आपल्या गहू, तांदूळ इतर धान्या मध्ये किड होणार नाही.

 

नक्की वाचा : कृषि विभाग महाराष्ट्र शासन सर्व सरकारी योजना

 

४) लवंग :

या पद्धतीमध्ये कडुलिंबाची वाळलेली पाने आणि लसूण हे सम प्रमाणात घ्यावे व त्यामध्ये १० ते १५ लवंगा टाकाव्यात. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून हे पदार्थ बारीक करून घ्यावे. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाच्या लहान आकाराच्या गोळ्या बनवाव्यात आणि सूर्य प्रकाशात सुकवाव्यात. यानंतर तयार झालेल्या गोळ्या ह्या पातळ कपड्यात प्रत्येकी एक बांधून साठवणुकीच्या धान्या मध्ये ठेवाव्यात जेणेकरून पुढे गोळ्या मोडल्या किंवा त्यांचा बारीक चुरा झाला तरी देखील आपल्या धान्यात पसरणार नाही आणि आपले धान्य किड पासून सुरक्षित राहील.

 

५) बोरिक अॅसिड (Boric Acid powder) :

 

बाजारात बोरिक अॅसिड (Boric Acid)  नावाने एक रासायनिक पावडर मिळते. ही बोरिक अॅसिड (Boric Acid) पावडर आपण एक क्विंटल गव्हासाठी 50-70 ग्रॅम  टाकावी. या पद्धतीचा वापर करताना, गहू हे उन्हामध्ये वाळू द्यावेत त्यानंतर साठवणूक करताना ही पावडर गव्हामध्ये मिश्रण करून घ्यावी आणि नंतर गहू हे पिशवी किंवा धान्याच्या कोठी मध्ये साठवणूक करावी.

 

तर, वरील पद्धतींचा वापर करून आपण गहू साठवणुक मध्ये किडींपासून संरक्षण करू शकतो.

 

 

 

FAQ :

 

गहू कसे साठवायचे?

गहू हे आपण धान्याच्या कोठी मध्ये साठवू शकतो. यामध्ये लोखंडी किंवा सीमेंट ची कोठी आपण वापरू शकता. तसेच, बाजरा मध्ये गहू व इतर धान्या साठवणूक करण्यासाठी पिशवी मिळतात यामध्ये देखील आपण साठवणूक करू शकता.

error: Content is protected !!