Soyabin kapus anudan : 7/12 वर नोंद असलेल्या सोयाबीन व कापूस शेतकर्यांना मिळणार अनुदान …. प्रक्रिया सुरू
Soyabin kapus anudan : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.
यासाठी ई-पीक पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली. तथापि, खरीप हंगामात सात-बारावर नोंद असूनही पोर्टलवर नोंद नसलेले खातेदार,वनपट्टाधारक खातेदार तसेच चंद्रपूर तालुक्यातील जिवती या तालुक्यातील नॉन डिजिटाइज खेड्यातील खातेदारांना अर्थसाह्याचा लाभ मिळू शकलेला नव्हता.
आता या नोंद नसलेल्यांची माहिती संकलित करून येत्या काळात अर्थसाह्य करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी शासन निर्णयानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.याबाबत विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना मंगळवारच्या (ता. ३) पत्रानुसार कळवण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी यादीत नाव नाही, परंतु त्यांच्या ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर खरिपामध्ये कापूस, सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसाह्य दिले जाणार आहे. यासाठी संबंधित गावातील खाते क्रमांकनिहाय खातेदाराचे संपूर्ण नाव, कापूस व सोयाबीन पिकाखालील पेरणी झालेले क्षेत्र संकलित करून संबंधित तलाठ्यांनी कृषि विभागाला स्वाक्षरीत करून द्यावे. या यादीसोबत संबंधित तलाठ्याने प्रमाणित केलेला ऑनलाइन सातबारा उतारा घेऊन जोडावा. (Soyabin kapus anudan)
तसेच राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेले आहे, अशा वनपट्टा धारकांपैकी ज्या वनपट्ट्यावर खरीप हंगामात कापूस किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती. त्याबाबतची गावनिहाय वनपट्टा क्रमांक, वनपट्टाधारक पूर्ण नाव, कापूस व सोयाबीन पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम यादी कृषी विभागास द्यावयाची आहे. (Soyabin kapus anudan)
याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आलेल्या आहेत. (Soyabin kapus anudan) जिवती तालुक्यातील गावांचे भूमी अभिलेख डिजिटइज झालेले नाही. तेथे ई-पीक पाहणी होऊ शकली नाही. अशा ठिकाणी जेथे भूमी अभिलेख डिजिटइज झाले नाहीत त्या गावातील तलाठ्यांकडून गावातील खाते क्रमांकनिहाय खातेदार लाभार्थी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. ही माहिती भरण्यासाठी १३ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
Tags : Soyabin kapus anudan, kapus soyabin anudan, bhavantar yojana, soybean cotton subsidy for farmers 2023,
* लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार
* रब्बी हंगाम ई पीक पाहणी सुरू…. अपडेट मोबाइल ॲप डाऊनलोड करा
* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू
* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत
* सोलर पंप कंपनी निवडण्याची प्रक्रिया सुरू … तुम्हाला आला का हा ऑप्शन?
* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती
* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना
* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर