Water Level in Dams : अवकाळी पावसानंतर मराठवाड्यातील धरणांमधील शिल्लक पाणीसाठा पहा
Water Level in Dams : सध्या राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे यामध्ये काही भागात गारपीट सह पाऊस झाला आहे. आणि असेच असेच वातावरण पुढील पाच दिवस म्हणजे 18 एप्रिल पर्यन्त राहण्याची शक्यता आहे. तर, या अवकाळी पावसामुळे सद्यस्थिती मध्ये मराठवड्यातील धरणा मधील पाणीसाठी किती आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
धरणांमधील शिल्लक पाणीसाठा (Water Level in Dams)
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात आज अखेर केवळ 17.61 टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. औरंगाबाद विभागातील 920 लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता 791.49 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.
मराठवाड्याच्या सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आता 15.62 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आता 339.11 दलघमी पाणी जायकवाडीत राहिले आहे. बीडमधील मांजरा धरण आता अवघ्या 5.67 टक्क्यांवर गेले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी 32.48 व सिध्देश्वर 39.08 टक्के भरले आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णूपूरी धरणात आता 31.72 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला असून निम्न मनारमध्ये 29.21 टक्के पाणी उरले आहे. (Water Level in Dams)
धाराशिवमधील बहुतांश धरणे शुन्यावर पोहोचली असून तेरणा धरणात 1.76 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच लातूरच्या भूसानी धरणात 13.42 टक्के, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात आता केवळ 5.65 टक्के , औरंगाबाद विभागातील 44 लहान, मध्यम मोठ्या धरणांमध्ये 17.61 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
राज्यातील एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत मराठवाड्यात सर्वात कमी पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
अधिक वाचा :
* नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई
* सर्वर डाउन ?? केवायसी अभावी अनुदान रखडले
* अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो?
* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता
* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ
* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा