MahaDBT Yojana : आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का? | पहा कृषि आयुक्तालायचे पत्र
महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Yojana) द्वारे दिनांक 11 मार्च 2024 रोजी कृषि यांत्रिकीकरण तसेच शेततळे, तुषार ठिबक साठी सोडत काढण्यात आली होती. परंतु, आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पूर्व संमती मिळेल की नाही याबाबत शंका होती तर ती शंका आता दूर झाली आहे.
तर, दिनांक 18 मार्च 2024 रोजी मा. कृषि संचालक, कृषि आयुक्तालय यांच्या अध्यक्षतेखाली कृषि यांत्रिकीकरण विषयी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये कृषि अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते तसेच, सभेमध्ये झालेली चर्चा व त्यावर काही निर्देश देण्यात आले आहेत. (MahaDBT Yojana)
“राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण, तसेच राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी दि.११/०३/२०२४ रोजी काढण्यात आलेली आहे आणि राज्यात आचारसंहिता दि. १६/०३/२०२४ रोजी लागू झाली आहे तर सदर योजना (MahaDBT Yojana) ही कार्यरत असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यास हरकत नाही” त्यामुळे पुढील कार्यवाही सुरू ठेवावी असे निर्देश दिलेले आहेत.
तर, आता या निर्णयामुळे राज्यातील कृषि यांत्रिकीकरण साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तर, सर्व निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत.
अधिक वाचा :
* शेतकर्यांनो सावध रहा, कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* “या” शेतकर्यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल
* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ
* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी
* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा
* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा