Kusum Beneficiary : शेतकर्‍यांनो सावध रहा | कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक | अशी घ्या काळजी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

मागील दोन वर्षांपासून राज्यातील शेतकरी हे कुसुम सोलर (Kusum Beneficiary) पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. परंतु, शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी काही बनावट वेबसाइट करून शेतकर्‍यांची फसवणूक होताना दिसत आहे. तर, सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की कुसुम सोलर पंप योजना ही महा ऊर्जा या विभागाकडून राबविण्यात येते आणि या विभागाचे फक्त एकच अधिकृत संकेतस्थळ आहे (www.mahaurja.com)  

 

Kusum Beneficiary

Kusum Beneficiary

 

कुसुम सोलर पंप (Kusum Beneficiary) योजनेत शेतकऱ्यांची फसवणूकीचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. या बनावट वेबसाईटवरून शेतकर्‍यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी लिंक पाठवली जात असून अशा कोणत्याही फसव्या वेबसाईट ला शेतकऱ्यांनी भेट देवू नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या पैशाचा भरणा अशा वेबसाइट वर करू नये, असे आवाहन महाउर्जा विभागाने केले आहे. (Kusum Beneficiary)

 

 

या योजनेत शेतकर्‍यांना SMS किंवा कॉल करून आपली निवड झाली असून आपण पेमेंट करावे असे सांगितल्या जात आहे. तर, सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे की या योजनेमध्ये अगोदर आपल्या शेताचा सेल्फ सर्वे करावा लागतो आणि तो सर्वे हा महाऊर्जा (Kusum Beneficiary) च्या अधिकृत मोबाइल अॅप्लिकेशन द्वारेच करता येतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याच अधिकृत अॅप्लिकेशन मध्ये पेमेंट ऑप्शन येत असते. परंतु, सध्या लाभार्थ्यांचे मोबाइल क्रमांक सहित याद्या प्रसारित झाल्यामुळे शेतकर्‍यांना बनावट वेबसाइट आणि अॅप्लिकेशन किंवा लिंक पाठवून पेमेंट करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत तर यासाठी कोणीही कोठे पेमेंट करू नये आणि आपल्याला पेमेंट ऑप्शन /सेल्फ सर्वे संदेश आला असेल तर आपण महाऊर्जा च्या आपल्या जिल्ह्यातील कार्यालयात जाऊन विचारपूस करून च निर्णय घ्यावा.

 

 

तर, शेतकरी बांधवानो असा कोणताही पेमेंट करण्या विषयी आपल्याला संदेश आला असेल तर आपण अगोदर आपल्या महाऊर्जा जिल्हा कार्यालयात संपर्क करून कन्फर्म करावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा.

 

 

 

अधिक वाचा :

* “या” शेतकर्‍यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

error: Content is protected !!