Majhi Ladki Bahin Yojana : ठरलं तर मग ! या तारखेला येणार 3000 रुपये बँक खात्यात
Majhi Ladki Bahin Yojana : राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती. तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 1 कोटीपेक्षा अधिक अर्ज हे शासनाकडे सादर झाले आहेत अजून देखील अर्ज करणे सुरू आहे कारण आता ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यन्त दिली आहे. तर, आता यासोबत च मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जून आणि ऑगस्ट महिन्याचं हफ्ता हा एकत्रित वितरित करण्यात येणार आहे आणि हा हफ्ता 17 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana
तर, राज्य सरकार कडून 17 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात महिलाना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या व दुसर्या हफ्त्याचे एकूण 3000/- रुपये हे खात्यात वितरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. Majhi Ladki Bahin Yojana
या योजनेसाठी पात्र महिलांकडून नारी शक्ति मोबाइल अॅप्लिकेशन व तसेच लाडकी बहीण पोर्टल द्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते त्यापैक काही अर्ज हे त्रुटि असल्यामुळे परत करण्यात आले आहेत तर काही अर्ज हे परिपूर्ण असल्याने मंजूर करण्यात आले आहेत. तर, आता ज्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत त्यांनी तात्काळ आपले बँक खाते हे डीबीटी (DBT enable ) लिंक करून घ्यावे. कारण, या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्येच वितरित करण्यात येणार आहेत.
त्यामुळे, अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते हे आधार शी लिंक आहे की नाही हे तापसून पहावे. तसेच, आपले खाते लिंक नसेल तर ते बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे किंवा मग आपले इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे नवीन खाते उघडावे. यापैकी जे सोयिस्कर असेल ते लवकर काम करून घ्यावे.