Soyabin Kapus anudan : अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची मुख्यमंत्री यांची घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Soyabin Kapus anudan : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती.

 

Soyabin Kapus Anudan 2023

 

तर, या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाच्या दि.११ जूलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

 

ई पीक पाहणीची अट रद्द ची घोषणा? (Soyabin Kapus anudan)

 

बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीच्या अटीवर वक्तव्य केलं यावेळी त्यांनी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीसाठी असणारी अट रद्द करत असल्याची घोषणा केली.

 

तर या कार्यक्रमांत मुख्यमंत्री म्हणाले, सातबारावर आहे त्याच पिकाच्या नोंदी प्रमाणे सोयाबीन आणि कापूसाला अनुदान दिले जाईल. परंतू याबाबत अद्याप राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

तर, पुढे कृषि विभाग आणि महसूल विभाग कशा प्रकारे हे अनुदान वितरण देईल याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष वेधले आहे.

 

error: Content is protected !!